Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांवर विश्वास, तरीही CBI कडे तपास द्यायचा असल्यास विरोध नाही: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 05:02 PM2020-08-12T17:02:57+5:302020-08-12T19:24:46+5:30

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर पोलीस तपासावरून राजकारण सुरू आहे.

Sushant Singh Rajput's suicide is unfortunate, but why is it being discussed so much?, ask NCP chief Sharad Pawar | Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांवर विश्वास, तरीही CBI कडे तपास द्यायचा असल्यास विरोध नाही: शरद पवार

Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांवर विश्वास, तरीही CBI कडे तपास द्यायचा असल्यास विरोध नाही: शरद पवार

Next

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर पोलीस तपासावरून राजकारण सुरू आहे. बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली. केंद्रानं ती मंजूरही केली. तरीही त्यावरून राजकारण तापले आहे. महाराष्ट्र राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केली जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी बुधवारी महत्त्वाचे विधान केलं. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या दुर्दैवीच, पण त्यावर एवढी चर्चा कशासाठी?, असा सवाल त्यांनी केला.

वेदनादायी: कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू झाला अन् धक्क्यानं तासाभरात मुलीनंही जीव सोडला

शरद पवार म्हणाले की,''मी गेली 50 वर्षे महाराष्ट्र व मुंबई पोलिसांना पाहतोय आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. अन्य लोकं काय टीका करतात यावर मला काहीच बोलायचे नाही. या प्रकरणाचा तपास CBIनं किंवा अन्य कुणी करावा, असं कोणाला वाटत असेल तर त्यांना मी विरोध करणार नाही.''


ते पुढे म्हणाले,''सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या दुर्दैवीच, पण त्यावर एवढी चर्चा कशासाठी? ही मोठी समस्या आहे, असं मला वाटत नाही. एका शेतकऱ्यानं मला सांगितलं की जवळपास 20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याबाबत कोणीच बोलत नाही.''  

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी कुणी काय आरोप केले, याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली, तर निश्चितच दु:ख होते, पण याची ज्या पद्धतीने चर्चा होते, मला त्याबद्दल आश्चर्य वाटते, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

 

पाटणा पोलिसांविरोधात FIR दाखल करण्यासाठी मुंबईत तक्रार दाखल

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूला आणखी एक नवीन वळण आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केल्यानंतर पाटण्यात दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे तपास करण्यासाठी मुंबईला गेलेल्या पाटणा पोलिसांच्या पथकाविरुध्द ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी ही तक्रार मुंबईतील न्यू पनवेल येथे राहणाऱ्या अजय सिंह सेंगर यांनी केली आहे. ते महाराष्ट्र करणी सेनेशी संबंधित आहेत.
 

14 जूनला केली आत्महत्या

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईत त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  मुंबई पोलीस या प्रकरणात सातत्याने चौकशी करत होते. त्याचवेळी सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांच्या पथकानेही मुंबई गाठली. आता हे प्रकरण सीबीआयकडे आहे. दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची मनी लाँड्रिंगच्या अँगलने चौकशी करत आहे. 

IPL 2020 : विश्रांतीचा कालावधी संपला; हार्दिक पांड्या कसून तयारीला लागला

अन्य महत्त्वाचे बातम्या

अरे देवा... IPL 2020 सुरू होण्यापूर्वीच माजी विजेत्या संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह! 

खतरनाक लँडींग! Video पाहिल्यावर नुसता घामच नाही तर धडकी भरेल

मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना? IPL 2020चे वेळापत्रक व्हायरल

IPL 2020ची टायटल स्पॉन्सरशिप 'पतंजली'ला मिळाली, तर कसा असेल लोगो? फोटो व्हायरल 

बंगालमध्ये सुरक्षित आहे, यूपीत असते तर माझ्यासोबत वाईट झालं असतं; हसीन जहाँनं दाखल केली FIR 

अनुष्काने केली प्रश्नांची सरबत्ती; रागीट विराट पत्नीसमोर हरला; Video Viral

Web Title: Sushant Singh Rajput's suicide is unfortunate, but why is it being discussed so much?, ask NCP chief Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.