Sushant Singh Suicide Case: मला संजय राऊतांनी धमकी दिली; कंगनाच्या आरोपांना राऊतांकडून जोरदार प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 02:12 PM2020-09-03T14:12:44+5:302020-09-03T14:15:36+5:30
Sushant Singh Suicide Case: ठाकरे सरकार आणि कंगनामध्ये सुशांत प्रकरणावरून जुंपली
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून अभिनेत्री कंगना राणौत आणि राज्य सरकारमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. कंगनानं ठाकरे सरकारसह मुंबई पोलिसांवर सातत्यानं निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत परतू नये यासाठी धमकी दिली होती, असा खळबळजनक आरोप करणाऱ्या कंगनाला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा आणि तुमच्याकडे असलेले पुरावे त्यांना द्या, असे राऊत म्हणाले.
कंगना राणौतचा रणबीर, रणवीर, विकीवर हल्लाबोल; म्हणाली, ड्रग्ज घेत नाही तर ब्लड टेस्ट करा...!
बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचं काही दिवसांपूर्वीच कंगनानं म्हटलं होतं. संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावादेखील तिनं केला आहे. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला.
बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती; कंगना राणौतचे राम कदमांना उत्तर
कंगनानं याआधी मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. 'कंगना राणौत गेल्या 100 तासांहून अधिक काळापासून ड्रग माफियांची पोलखोल करण्यास तयार आहे. तिला पोलीस सुरक्षेची गरज आहे. पण महाराष्ट्र सरकार ते पुरवत नाही,' असं ट्विट भाजप आमदार राम कदम यांनी केलं होतं. यावर कंगनानं मुव्ही माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत आहे. मुंबईमध्ये मला हिमाचल प्रदेश सरकार किंवा केंद्र सरकारची सुरक्षा हवी, मुंबई पोलिसांची नको, असं उत्तर दिलं. विशेष म्हणजे राम कदम यांनी कंगनाच्या मताचं समर्थनही केलं.
नेटकऱ्यांकडून कंगनाचा समाचार
कंगनानं मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या ट्विटचा नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेतला. फुकटच्या प्रसिद्धीसाठी काहीही बरगळू नकोस, मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर मुंबईत महाराष्ट्रात राहू नकोस, येथून निघून जा, असा सल्ला देत तिचा निषेध केला.
सुशांत प्रकरणात कंगनाचे धक्कादायक आरोप
रिया चक्रवर्ती ही एक प्यादे आहे. तिला सुशांतला पैशांसाठी वापरले असेल. फिल्म मिळविण्यासाठी किंवा त्याला ड्रग देण्यासाठी. पण रियाच्या मागे कोण मास्टरमाईंड आहे, आपल्याला जाणून घ्यायला हवं, असं कंगनानं एका मुलाखतीत म्हटलं.