Sushant Singh Rajput death Case : सध्या तरी सलमान खानला ‘समन्स’ नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 07:03 AM2020-07-16T07:03:51+5:302020-07-16T07:04:25+5:30

बॉलिवूड माफियांनी व्यावसायिक वैमनस्यातून सुशांतचे मानसिक खच्चीकरण केले. त्यातून तो तणावात गेला आणि अखेर त्याने आयुष्य संपविले, असे आरोप त्याच्या चाहत्यांकडून केले जात आहेत.

Sushant suicide; Currently, Salman Khan has no summons | Sushant Singh Rajput death Case : सध्या तरी सलमान खानला ‘समन्स’ नाही

Sushant Singh Rajput death Case : सध्या तरी सलमान खानला ‘समन्स’ नाही

Next

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याच्या आत्महत्येप्रकरणी सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडून बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याला जबाबदार धरले जात आहे. मात्र सध्या तरी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात येणार नसल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
बॉलिवूड माफियांनी व्यावसायिक वैमनस्यातून सुशांतचे मानसिक खच्चीकरण केले. त्यातून तो तणावात गेला आणि अखेर त्याने आयुष्य संपविले, असे आरोप त्याच्या चाहत्यांकडून केले जात आहेत. त्यामध्ये सलमान खान हा मुख्य असून त्याच्याच सांगण्यावरून सुशांतकडून मोठ्या बॅनरचे चित्रपट काढून घेतल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सुशांतप्रकरणी मुंबई पोलीस सलमानची चौकशी करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र बुधवारी पोलिसांनी ही बाब फेटाळून लावली. सलमानची चौकशी करण्यासाठी अद्याप तरी त्याला समन्स बजावलेले नाहीत. आतापर्यंत अनेक जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यातून सुशांतच्या आत्महत्येमागे सलमान खान असेल असे वाटत नाही. त्यामुळे त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जबाबासाठी बोलावले, पण बहीण मुंबईबाहेर
आम्ही याप्रकरणी सलमान खानला समन्स पाठविलेले नाही, असे परिमंडळ ९चे पोलीस उपायुक्त, अभिषेक त्रिमुखे यांनी स्पष्ट केले. तर सुशांतच्या मुंबईत राहणाºया बहिणीला आम्ही जबाब नोंदविण्यासाठी बोलावले आहे. मात्र ती बाहेर असल्याने अद्याप येऊ शकली नाही. पण तिचाही जबाब आम्ही नोंदविणार आहोत, असे एका वरिष्ठ तपास अधिकाºयाने सांगितले.

Web Title: Sushant suicide; Currently, Salman Khan has no summons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.