Join us

सुशांतच्या व्यसनाची त्याच्या कुटुंबाला पूर्वीपासूनच माहिती होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:07 AM

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन; रिया चक्रवर्तीचा दावालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याला ड्रग्जचे ...

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन; रिया चक्रवर्तीचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याला ड्रग्जचे व्यसन असल्याची त्याच्या कुटुंबीयांना पूर्ण कल्पना होती. अनेकदा त्याची बहीण व मेहुणा सिद्धार्थ त्याच्यासाठी गांजा घेऊन येत आणि स्वतःही घेत होते, अशी धक्कादायक माहिती सुशांतची प्रेयसी व या प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती हिने दिली.

अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) दाखल केलेल्या आरोपपत्रात रियाचा जबाब नमूद आहे. त्यामध्ये रियाने सुशांतच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.

गेल्यावर्षी १४ जूनला सुशांतचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला हाेता.

एनसीबीला दिलेल्या जबाबात रियाने म्हटले आहे की, सुशांतची प्रकृती ठीक नव्हती, उलट ती अधिकच बिकट होत चालली होती, म्हणून शोविक (रिया चक्रवर्ती हिचा भाऊ) चिंतेत होता. ८ जून २०२० रोजी सुशांतची बहीण प्रियंकाकडून एक व्हाॅट्सॲप मॅसेज आला. यात असा उल्लेख होता की, लिब्रियम १० एमजी, नेक्सिटाे, आदी बंदी असलेली औषधे सुशांतला द्यावीत, त्यासाठी तिने कार्डियोलॉजिस्ट डॉक्टरचे एक प्रिस्क्रिप्शनही दिले होते. त्यांनी सुशांतला ओपीडी पेशंट म्हणून मार्क केले होते आणि न भेटताच ऑनलाईन कंसल्टेशन केले. याचा अर्थ सुशांतला रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती, ही औषधे कंसल्टेशनशिवाय दिली जाऊ शकत नव्हती.

रियाने आपल्या जबाबात पुढे असेही नमूद केले आहे की, या ड्रग्जमुळे त्याचा मृत्यू झाला असता. कारण त्याची बहीण मीतू, त्याच्यासोबत ८ ते १२ जूनदरम्यान होती. मी मुंबई पोलिसांनाही ही गोष्ट सांगितली आहे. मला भेटण्यापूर्वीच त्याला अमली पदार्थांचे व्यसन होते. माझ्या संमतीशिवाय सुशांत ‘मरिजुआना’ (गांजा) खायचा. त्याचे हे ड्रग्सचे व्यसन त्याच्या घरातील सदस्यांनाही माहीत होते. मी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा माझ्याकडे पुरावा आहे. परंतु, सुशांत त्यासाठी तयार नव्हता, म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करता आले नाही. त्याची बहीण आणि मेहुणा सिद्धार्थ सुशांतबरोबर ‘मरिजुआना’ खायचे आणि तेही ते आणत असत.

...............................................................