Join us  

"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 5:46 PM

Maharashtra Politics : आज सकाळी राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली. पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला होता.

Maharashtra Politics ( Marathi News ) : आज सकाळी राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली. पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला होता. ठाकरे गटातील आणखी दोन खासदार काही दिवसातच शिंदे गटात येणार असल्याचा दावा नरेश मस्के यांनी केला. यामुळे आता राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच मोठी राजकीय घडामोड होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नरेश म्हस्के यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे. 

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? 'ठाकरे गट फुटणार' शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा, प्लॅनही सांगितला

आज सकाळी नरेश म्हस्के यांनी दावा करत ठाकरे गटातील खासदार पुन्हा फुटणार असल्याचा दावा केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे ९ खासदार निवडून आले आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले आहेत, यामुळे राज्यात पुन्हा ठाकरेंची जोरदार चर्चा सुरु आहे. "ठाकरे गटाचे ९ खासदार निवडून आले आहेत. यापैकी दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत. दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधल्याचा दावा नरेश म्हस्के  यांनी केला होता. या दाव्याला प्रत्युत्तर देत सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केली.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

"शिंदे गटाला एखादं मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे, या मंत्रिपदासाठी यासाठी आदळआपट करुन, काहीतरी न्यूजसेन्स व्हॅल्यू करुन लक्ष वेधून घेण्याचा अत्ंयत बालिश प्रयत्न नरेश मस्के यांच्याकडून सुरू आहे. पण, मस्केजी जरा विचार करा एकनाथ शिंदे यांचं एवढं मोठं मन नाही की, एक मंत्रिपद मिळत असेल तर ते मंत्रिपद आपला मुलगा श्रीकांत शिंदे याला सोडून ते तुमच्या सारख्यांना देतील असं वाटतं नाही, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला आहे. नरेश मस्के खासदार झाल्यात म्हटल्यावर त्यांची बुध्दीची पातळी वाटली असेल असं मला वाटलं होतं, पण त्यांचा थिल्लरपणा अजूनही गेलेला नाही, असंही अंधारे म्हणाल्या. 

शिंदे गटाचा दावा काय?

 "ठाकरे गटाचे ९ खासदार निवडून आले आहेत. यापैकी दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत. दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधल्याचा दावा नरेश म्हस्के  यांनी केला आहे.

"आपल्या मतदारसंघातील विकासकामे झाली पाहिजेत, अशी त्या खासदारांची इच्छा आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो असं सांगितलं आहे. मुल्ला मौलवींना पैसे देऊन मते विकत मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असं या खासदारांनी आम्हाला सांगितले, असंही मस्के म्हणाले. पक्षांतर बंदीची कारवाई रोखण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखला आहे, आम्ही सहा खासदारांची लवकरच संख्या जमवतो आणि लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मोदी साहेबांना पाठिंबा देऊ, असंही ते दोन खासदार म्हणाले आहेत, असा दावाही म्हस्के यांनी केला.

टॅग्स :सुषमा अंधारेशिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरेनरेश म्हस्के