Join us

सुषमा अंधारेंनी अटकेतील तरुणाच्या आईचे अश्रू पुसले; सरकारकडे तीन मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 9:12 AM

मुंबई - शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर, शिवसेना शिंदे गटाच्या ...

मुंबई - शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर, शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांनी त्या युवकाच्या घरी जाऊन धमकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी डायरे कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच, याप्रकरणी तीन मागण्या केल्या असून उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली एसआयटीची मागणी केली आहे. दूध का दूध, पाणी का पाणी झालंच पाहिजे. बिल्कूल याची चौकशी झाली पाहिजे. एसआयटी नेमताना पुलीस भी तुम्हारी, लोक भी तुम्हारे, और जजमेंट भी तुम्हारा ये बात नही चलेगी, असेही अंधारे यांनी म्हटले. यावेळी, अटक मुलाच्या आईला अश्रू अनावर झाले होते. 

विनायक डायरे या तरुणाच्या घरी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भेट दिली. यावेळी, विनायकच्या आईला अश्रू अनावर झाले होते, ते पाहून सुषमा अंधारेंचेही डोळणे पाणावले. तर, विनायच्या आईला मिठी मारत त्यांची आपुलकीने समजूत काढली. आरोपी कुठेही पळून गेलेला नाही, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मग, कुटुंबीयांना दमदाटी करण्याचा, त्रास देण्याचा किंवा घरात नासधूस करण्याचा प्रयत्न का झाला, असं करणे हा कायदेशीर गुन्हा आहे, असं असूनही पोलीस तो गुन्हा नोंदवून घेत नसतील तर आम्ही आता ३ मागण्या करत आहोत. आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाच्या अकाऊंटवरुन जे लाईव्ह झालं ते नंतर डिलीट झालं, ते सायबर विभागाने रिकव्हर केलंच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जर व्हिडिओ मॉर्फ आहे, तर ओरिजनल व्हिडिओ शोधलाच पाहिजे आणि जी एसआयटी नेमायची ती उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखालीच नेमली पाहिजे, अशा तीन मागण्या सुषमा अंधारे यांनी केल्या आहेत.  

दरम्यान, ज्याने पहिल्यांदा हा व्हिडिओ अपलोड केला, त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. त्यासोबतच, वायले कुटुंबीयांनाही संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणीही अंधारे यांनी केली आहे. 

आम्ही चुकीच्या कृतीचे समर्थन करीत नाहीत. अशा एखाद्या घटनेचे निमित्त करुन जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रस दिला जात आहे. प्रकाश सुव्रे या प्रकरणात काहीच बोलत नाहीत. त्यांनी बोलणे फार अपेक्षित आहे. कारण त्यांची बहिण शीतल म्हात्रे या त्यांना भाऊ मानतात. बहिणीवर घाणेरडे आरोप होत असताना भावाने पुढे आले पाहिजे. बोलले पाहिजे.  मात्र ते का बोलत नाही. याचा अर्थ कुठे तरी म्यूनिप्यूशन होत आहे का, याचाही विचार केला पाहिजे.

डायरे कुटुंबीयांकडून पोलिसात तक्रार

शीतल म्हात्रे व्हीडीओ व्हायरल प्रकरणी कल्याणमधील ठाकरे गटाच्या विनायक डायरे याला दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर शिंदे गटाच्या तीन जणांनी डायरे यांच्या कुटुंबियांना धमकाविले. जीवे मारण्याची धमकी दिली. डायरे यांच्या कुटुंबियांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी नावानिशी तक्रार नोंदविली नाही. 

टॅग्स :सुषमा अंधारेमुंबईपोलिसगुन्हेगारी