सुषमा स्वराज म्हणजे राष्ट्राला समर्पित नेतृत्व - मुख्यमंत्री फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 02:24 AM2019-08-13T02:24:35+5:302019-08-13T02:25:01+5:30

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी त्यांचे आयुष्य राष्ट्राला समर्पित केले होते. त्यांची लोकसभेतील भाषणे अभ्यासपूर्ण आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची चिरफाड करणारी असायची, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

Sushma Swaraj means dedicated leadership to the nation - Chief Minister Fadnavis | सुषमा स्वराज म्हणजे राष्ट्राला समर्पित नेतृत्व - मुख्यमंत्री फडणवीस

सुषमा स्वराज म्हणजे राष्ट्राला समर्पित नेतृत्व - मुख्यमंत्री फडणवीस

Next

मुंबई : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी त्यांचे आयुष्य राष्ट्राला समर्पित केले होते. त्यांची लोकसभेतील भाषणे अभ्यासपूर्ण आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची चिरफाड करणारी असायची, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. स्वराज्य यांचे शेवटचे भाष्यदेखील देशभावनेने प्रेरितच होते. ३७० कलम हटवल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. हे मत व्यक्त केल्यावरच त्यांनी जगाचा निरोप घेतला, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

दादर येथील वसंतस्मृती या भाजप कार्यालयात सोमवारी सुषमा स्वराज यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, राज्यमंत्री योगेश सागर, विद्या ठाकूर, आमदार अतुल भातखळकर, भाई गिरकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, स्वराज वयाच्या पंचविसाव्या वर्षी हरियाणाच्या मंत्री बनल्या. पुढे दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या. स्वराज राजकीय पक्षाच्या पहिल्या प्रवक्ता झाल्या. त्या चार राज्यांतून निवडून आल्या, हे अद्वितीय आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आज देशभरात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात असलेले पासपोर्ट कार्यालय हे सुषमाजींचे काम आहे. तसेच तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्या दूरसंचार व आरोग्यमंत्री होत्या. एम्सच्या देशभरातील विस्ताराच्या जनक सुषमाजी होत्या, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संघाचे संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी म्हणाले की, सुषमाजींचा मूल्यांवर विश्वास होत्या. त्यांचे नेतृत्व खºया अर्थाने व्रतस्थ होते. त्यांनी परराष्ट्रमंत्री असताना हे खाते लोकाभिमुख केले, हे मोठे काम होते. त्यांची उणीव आम्हाला कायमच जाणवेल. दरवर्षी राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला त्यांचा न चुकता फोन यायचा, अशी भावनिक आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
 

Web Title: Sushma Swaraj means dedicated leadership to the nation - Chief Minister Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.