दिंडोशी अपहरण प्रकरणी एक अटकेत
By Admin | Published: February 23, 2016 02:46 AM2016-02-23T02:46:10+5:302016-02-23T02:46:10+5:30
दिंडोशी येथील खुशी सिंग (३) या चिमुरडीच्या अपहरणात तिच्या आईचा हात असल्याचा संशय दिंडोशी पोलिसांना असून, या प्रकरणी एका संशयिताला उत्तर प्रदेशमधून सोमवारी अटक
- गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबई
दिंडोशी येथील खुशी सिंग (३) या चिमुरडीच्या अपहरणात तिच्या आईचा हात असल्याचा संशय दिंडोशी पोलिसांना असून, या प्रकरणी एका संशयिताला उत्तर प्रदेशमधून सोमवारी अटक करण्यात आली आहे.
बुधवारी दुपारी खुशीचे राहत्या घरातून अपहरण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती आईने पाच ते सहा लोकांची नावे घेतली. यात राहुल सिंग (२८) याचे नाव समोर येताच, पोलिसांनी त्याचा पाठलाग करत, उत्तर प्रदेशातील सुलतानपूर गाठले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. महत्त्वाचे म्हणजे, चौकशीच्या वेळी मुलीची आई प्रियांका वारंवार आपले जबाब बदलत आहे. त्यामुळे तीदेखील संशयाच्या फेऱ्यात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे स्थानिक न्यायालयाने राहुल सिंग याला २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, एकाच महिन्यात खुशीचे दोन वेळा अपहरण झाल्याचे तपासात समोर आले आहे. १७ फेब्रुवारीपूर्वी १४ फेब्रुवारीलाही खुशी अशाच प्रकारे गायब झाली होती. दोन तासांच्या शोधानंतर मालाडमधील पठाणवाडी परिसरात ती आढळून आली होती. परिणामी, तिच्या वारंवार हरविण्याचाही शोध पोलीस घेत आहेत.-