Join us  

संशयित गोवर रुग्णांची संख्या अडीच हजारांवर, आणखी एका बालकाच्या मृत्यूची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 10:43 AM

Mumbai: शहरात गोवर संसर्गाची तीव्रता गंभीर रूप धारण करत असून शुक्रवारी आणखी एका मृत्यूची नोंद झाली. भिवंडी येथील सहा महिन्यांच्या मुलाचा या आजारामुळे मृत्यू झाला.

मुंबई :  शहरात गोवर संसर्गाची तीव्रता गंभीर रूप धारण करत असून शुक्रवारी आणखी एका मृत्यूची नोंद झाली. भिवंडी येथील सहा महिन्यांच्या मुलाचा या आजारामुळे मृत्यू झाला.  आतापर्यंत ९ संशयित गोवर मृत्यूंची नोंद झाली आहे. शहर व उपनगरात संशयित गोवर रुग्णांची संख्या २८६० एवढी झाली आहे.  पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहर व उपनगरांत शुक्रवारी दिवसभरात गोवरचे १७ रुग्ण आढळले असून आता एकूण संख्या १७६ इतकी झाली आहे. पालिकेने गोवरचे लसीकऱण युद्धपातळीवर राबविण्यात येत असून आता मृत्यू झालेल्या मुलांच्या पालकांच्या मदतीनेही जनजागृती केली जात असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

रुग्णालयात दाखल वयोगटनिहाय रुग्णसंख्यानवजात बालक ते आठ महिने १८ ९ ते ११ महिने ९१ ते ४ वर्षे ६४ ५ ते ९ वर्षे २८ १० ते १४ वर्षे ९१५ वर्षे आणि त्यावरील ९एकूण दाखल रुग्ण १३७

गोवर उद्रेक असलेले विभागएम पूर्व ५, ई १, एफ उत्तर १, जी उत्तर १, एल ५, एम पश्चिम १, पी उत्तर १, एच पूर्व २, व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण २, संशयित मृत्यू  ०९ , बरे झालेले एकूण रुग्ण ४६, ऑक्सिजनवर उपचार घेत असलेले रुग्ण ७

टॅग्स :मुंबईआरोग्य