Join us

लष्कर-ए-तोयबाचा संशयित दहशतवादी सलीम खान अटकेत

By admin | Published: July 17, 2017 5:37 PM

सुरक्षा यंत्रणांनी लष्कर-ए-तोयबाचा संशयित दहशतवादी सलीम खान याला आज मुंबई विमानतळावरून अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - दहशतवादी कारवायांविरोधात सुरक्षा यंत्रणांना आज मोठे यश मिळाले आहे.  सुरक्षा यंत्रणांनी लष्कर-ए-तोयबाचा संशयित दहशतवादी सलीम खान याला आज मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. सलीम हा मूळचा उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यातील बंदीपूर गावातील रहिवासी आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्तरित्या कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. 
सलीम खान हा 2008 पासूनच सुरक्षा यंत्रणांच्या रडावर होता. त्याने 2007 साली मुझफ्फराबाद येथे दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते. 2008 मध्ये रामपूर सीआरपीएफ हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला दहशतवादी कौसर आणि शरीफ यांनी सलीमने आपल्यासोबत मुझफ्फराबादेत प्रशिक्षण घेतल्याची माहिती दिली होती. दरम्यान, नुकताच अटक करण्यात आलेला आयएसआयचा हस्तक आफताब याला सलीम परदेशातून सूचना देत होता. तसेच त्याला वित्तपुरवठाही करत होता.
अधिक वाचा 
(दहशतवादी संदीपचा भाऊ म्हणतो "त्याला गोळ्या घाला" )(होय, मी भारतात दहशतवादी हल्ले केले - सय्यद सलाहुद्दीन )(अमरनाथ हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा, पाकिस्तानी दहशतवादी इस्माईल मास्टरमाईंड )सलीमच्या दहशतवादी कारवायांमधील सहभागामुळे त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आले होते. दरम्यान, तो आज भारतात येत असल्याची माहिती मिळाल्यावर एटीएसने विमानतळावरून त्याला अटक केली. सध्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएसकडून त्याची चौकशी सुरू आहे.