व्हीप न मानणाऱ्या चार खासदारांचे निलंबन करा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 05:41 AM2023-09-28T05:41:20+5:302023-09-28T05:41:57+5:30
शिंदे गट लोकसभाध्यक्षांना पत्र पाठवणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे होत असताना आता शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाच्या खासदारांचे निलंबन करण्याची मागणी केली जात आहे. नारीशक्ती वंदन अधिनियम २०२३ संदर्भात लोकसभेतील मतदानावेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कारवाईची मागणी शिवसेना गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.
ते चाैघे काेण?
विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर व संजय जाधव.
वारसा सांगणारे कुठे हाेते?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच महिला आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका घेतली होती; पण त्यांच्या विचारांचा वारसा सांगणारे हे चार खासदार महिला आरक्षण विधेयकावरील मतदानाच्या वेळी सभागृहात उपस्थित नव्हते. यापैकी खासदार ओमराजे निंबाळकर हे तर दिल्लीमध्ये असूनही ते सभागृहात आले नाहीत, असेही शेवाळे म्हणाले.