मोबाइल वापरणाऱ्या शिक्षकाचे निलंबन रद्द करा

By Admin | Published: February 9, 2017 02:42 AM2017-02-09T02:42:34+5:302017-02-09T02:42:34+5:30

पनवेल येथील शिक्षकाचे निलंबन नियमबाह्य असून, तातडीने मागे घेण्याची मागणी शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांकडे केली आहे.

Suspend suspension of a mobile user | मोबाइल वापरणाऱ्या शिक्षकाचे निलंबन रद्द करा

मोबाइल वापरणाऱ्या शिक्षकाचे निलंबन रद्द करा

googlenewsNext

मुंबई : पनवेल येथील शिक्षकाचे निलंबन नियमबाह्य असून, तातडीने मागे घेण्याची मागणी शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांकडे केली आहे.
राज्यातील शिक्षकांना शाळेच्या आवारात मोबाइल वापरण्यावर निर्बंध घालण्याबाबत, शालेय शिक्षण विभागाने १८ फेब्रुवारी २००९ रोजी आदेश काढला होता. त्यानुसार, शालेय कामकाजाच्या वेळेत मोबाइल वापरल्यास १०० रुपये दंड आकारण्यात यावा, असे शासन निर्णयात म्हटले होते. या शासन निर्णयामुळे मोबाइलद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन करताना अडचणी येत असल्याने, शालेय शिक्षण विभागाने २८ मे २०१५ रोजी मोबाइल वापरण्यावरील निर्बंध उठविले. तेव्हापासून प्रभावी अध्यापन करण्यासाठी शिक्षक स्वत:चे इंटरनेट वापरून विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारे अध्यापन करीत असल्याचा दावा शिक्षक परिषदेने केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suspend suspension of a mobile user

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.