मुंबई : पनवेल येथील शिक्षकाचे निलंबन नियमबाह्य असून, तातडीने मागे घेण्याची मागणी शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांकडे केली आहे. राज्यातील शिक्षकांना शाळेच्या आवारात मोबाइल वापरण्यावर निर्बंध घालण्याबाबत, शालेय शिक्षण विभागाने १८ फेब्रुवारी २००९ रोजी आदेश काढला होता. त्यानुसार, शालेय कामकाजाच्या वेळेत मोबाइल वापरल्यास १०० रुपये दंड आकारण्यात यावा, असे शासन निर्णयात म्हटले होते. या शासन निर्णयामुळे मोबाइलद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन करताना अडचणी येत असल्याने, शालेय शिक्षण विभागाने २८ मे २०१५ रोजी मोबाइल वापरण्यावरील निर्बंध उठविले. तेव्हापासून प्रभावी अध्यापन करण्यासाठी शिक्षक स्वत:चे इंटरनेट वापरून विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारे अध्यापन करीत असल्याचा दावा शिक्षक परिषदेने केला आहे. (प्रतिनिधी)
मोबाइल वापरणाऱ्या शिक्षकाचे निलंबन रद्द करा
By admin | Published: February 09, 2017 2:42 AM