आरटीओतील निलंबित ३७ अधिकारी पुन्हा सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 09:53 PM2019-02-07T21:53:14+5:302019-02-07T21:54:34+5:30

विविध ठिकाणी नियुक्ती

The suspended 37 officials of the RTO are in service | आरटीओतील निलंबित ३७ अधिकारी पुन्हा सेवेत

आरटीओतील निलंबित ३७ अधिकारी पुन्हा सेवेत

Next
ठळक मुद्दे विभागीय चौकशीच्या अधीन राहून त्यांना सेवेत घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. विभागीय चौकशीच्या अधीन राहून त्यांना सेवेत घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई - प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्गंत (आरटीओ) विविध ठिकाणी कार्यरत असताना वाहन नोंदणी करण्याच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याने निलंबित करण्यात आलेल्या ३७ वाहन निरीक्षक अधिकाऱ्यांना पुन्हा विविध ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये २८ वाहन निरीक्षक व ९ सहाय्यक निरीक्षकाचा समावेश असूून त्यांच्या नियुक्तीचे आदेश आज गृह विभागाच्यावतीने काढण्यात आले. विभागीय चौकशीच्या अधीन राहून त्यांना सेवेत घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
आरटीओच्या राज्यभरातील विविध कार्यालयात मोटार नोंदणी, योग्यता पडताळणी प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचे २०१३ मध्ये चव्हाट्यावर आले होते. याप्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती. प्राथमिकदृट्या दोषी आढळलेल्या २८ निरीक्षक व ९ सहाय्यक निरीक्षकांना निलंबित करण्याचा निर्णय तत्कालिन परिवहन आयुक्तांनी घेतला होता. या ३७ अधिकाऱ्यांवर एकत्रित दोषारोप पत्र जारी करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावरील चौकशीची प्रकरणे दिर्घकाळ प्रलंबित राहिली. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियम व सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधी १३ आॅक्टोबर २०१०मध्ये जारी केलेल्या तरतुदीनुसार संबंधित अधिकाºयांना सेवेत पुन:स्थापित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संबंधितांची आज विविध ठिकाणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात नियुक्ती देण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.  

Web Title: The suspended 37 officials of the RTO are in service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.