साठे महामंडळ : लोकमतचा दणकामुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या उपहाव्यवस्थापक (प्रकल्प) वंदना राणे यांच्यासह अन्य सात कर्मचार्यांना आज महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी निलंबित केले. राणे यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. लोकमतने उजेडात आणलेल्या ३८५ कोटी रुपयांच्या या घोटाळ्याची चौकशी सीआयडीमार्फत सुरू आहे. महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार रमेश कदम यांच्या विविध संस्थांना कोट्यवधी रुपयांचे नियमबाह्य कर्जवाटप महामंडळामार्फत करण्यात आले होते. या कर्जवाटपाच्या मंजुरीच्या फायलींवर वंदना राणे यांच्या सह्या होत्या. या संस्थांमध्ये मैत्रेयी शुगर हा साखर कारखाना, अण्णाभाऊ साठे सूतगिरणी, जोशाबा ग्राहक संस्था; बोरीवली आदींचा समावेश आहे. याशिवाय, महामंडळामार्फत विविध जिल्ह्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे कर्जवाटप बोगस लाभाथर्र्ींना करण्यात आले. त्या याद्याही राणे यांच्या सहीने जिल्हा कार्यालयांना पाठविण्यात आल्या होत्या, असे म्हटले जाते. या महाघोटाळ्याची चौकशी सुरू झाल्यापासून राणे यांच्याकडून सीआयडीने अनेक प्रकारची माहिती घेतली. राणे यांनी सहकार्याची भूमिकादेखील घेतली होती. महामंडळात जवळपास ८५ कर्मचार्यांची नियमबाह्य भरती करण्यात आल्याचे प्रकरणदेखील लोकमतनेच उघडकीस आणले होते. त्यातील बर्याच कर्मचार्यांनी निलंबनाच्या भीतीने न्यायालयात धाव घेतली. तथापि, ही भरती नियमबाह्यच असल्याचा निर्वाळा ज्या ज्या कर्मचार्यांबाबत न्यायालयाने दिलेला आहे त्यांना निलंबित करण्याची प्रक्रिया महामंडळाने सुरू केली आहे. त्या अंतर्गत आज सात कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले.
उपमहाव्यवस्थापकासह ८ जणांना केले निलंबित
By admin | Published: September 01, 2016 6:15 AM