मुंबई: अँटिलिया स्फोटकं प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन वाझेंच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. सचिन वाझेंना ३ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. वाझे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ताब्यात आहेत. वाझे यांना १३ मार्चला अटक करण्यात आली. त्यांची कोठडी आज संपत असल्यानं त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. वाझेंकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं घ्यायची असल्यानं चौकशी करण्यास वेळ हवा, असं एनआयएच्या वकिलांनी न्यायमूर्तींनी सांगितलं. यानंतर वाझेंच्या कोठडीत १० दिवसांनी वाढ करण्यात आली. Suspended Mumbai Cop Sachin Vaze sent to NIA custody till April 3:एनआयएच्या वकिलांनी न्यायालयात अतिशय धक्कादायक माहिती दिली. सचिन वाझेंच्या घरात ६२ जिवंत काडतुसं सापडली आहेत. इतकी काडतुसं घरात का ठेवली होती, असा प्रश्न वाझेंना विचारण्यात आला. मात्र त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. सचिन वाझे पोलीस अधिकारी होते. त्यांनी विभागातून ३० जिवंत काडतुसं मिळाली होती. मात्र यापैकी केवळ पाचच गोळ्या वाझेंकडे मिळाल्या. उरलेली काडतुसं कुठे आहेत, याचंही समाधानकारक उत्तर वाझेंना देता आलेलं नाही, असं वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.मनसुख हिरेन एका जप्त केलेल्या मर्सिडीजमधून जाताना दिसले; सीएसएमटीच्या रस्त्यावरील सीसीटीव्हीत दृश्य कैद पोलीस विभागातून घेतलेल्या ३० पैकी २५ काडतुसांचं काय झालं, त्यांचा वापर कुठे आणि कशासाठी केला, अशी प्रश्नांची सरबत्ती एनआयएनं केली. मात्र यातल्या एकाही प्रश्नाचं व्यवस्थित उत्तरं देणं वाझेंना जमलेलं नाही. त्यांनी अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिलेली नाहीत. त्यामुळेच त्यांची कोठडी वाढवण्यात यावी, अशी मागणी एनआयएनं न्यायालयाकडे केली.मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर सचिन वाझे पोहचले 'डोंगरी'त; बारवर धाड टाकण्याचं देखील केलं ढोंगमला बळीचा बकरा केलं जातंय; वाझेंचा दावामुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्याच्या कटाचे मुख्य सूत्रधार वाझेच असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. मला बळीचा बकरा केलं जात असल्याचा दावा त्यांनी केला. मी समाजाविरोधात कट केलेला नाही. तसं असल्यास एनआयएनं ते सिद्ध करावं. मी एनआयएला तपासात, चौकशीत पूर्ण सहकार्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा कोठडी देऊ नका, अशी विनंती वाझेंनी न्यायमूर्तींकडे केली.