निलंबित जेलरची चौकशी अद्याप रखडलेलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 06:05 AM2017-08-29T06:05:04+5:302017-08-29T06:05:08+5:30

कारागृहातील महिला कर्मचा-यांचा लैंगिक छळ करणारा वादग्रस्त निलंबित जेलर हिरालाल जाधव याची चौकशी आठ महिने उलटूनही अद्याप पूर्ण झालेली नाही. चौकशी पूर्ण न झाल्याने चौकशीसाठी तक्रार निवारण समितीला दुसºयांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

Suspended prisoner inquiry still remained! | निलंबित जेलरची चौकशी अद्याप रखडलेलीच!

निलंबित जेलरची चौकशी अद्याप रखडलेलीच!

googlenewsNext

जमीर काझी
मुंबई : कारागृहातील महिला कर्मचा-यांचा लैंगिक छळ करणारा वादग्रस्त निलंबित जेलर हिरालाल जाधव याची चौकशी आठ महिने उलटूनही अद्याप पूर्ण झालेली नाही. चौकशी पूर्ण न झाल्याने चौकशीसाठी तक्रार निवारण समितीला दुसºयांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोल्हापूर, औरंगाबाद तुरुंगात कार्यरत असताना वादग्रस्त राहिलेले जाधव ठाणे मध्यवर्ती कारागृहात अधीक्षक असताना कैद्यांना पंचतारांकित सुविधा देण्यासाठी पैशांची मागणी करतात, अशी तक्रार काही कैद्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याबाबत चौकशी सुरू असताना गेल्या वर्षी २६ आॅगस्ट रोजी आपल्याला कळवा पूल येथे बोलावून शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसºया दिवशी पुन्हा मोबाइलवर अश्लील मेसेज पाठविले, अशी तक्रार एका महिला कर्मचाºयाने पोलीस ठाण्यात दिल्यानंतर जाधवविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी त्यांना निलंबित करून महाराष्टÑ नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९च्या नियम ८(२) व महिला छळ प्रतिबंधक कायदा नियम २०१३ अन्वये २३ डिसेंबर २०१६ रोजी चौकशी समिती नेमण्यात आली. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला. मात्र या वर्षी २४ मार्चपर्यंत चौकशी पूर्ण न झाल्याने पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र या काळातही ही चौकशी पूर्ण झालेली नसल्याने चौकशी समितीने २७ जुलैला केलेल्या मागणीनुसार पुन्हा दुुसºयांदा विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात जाधव यांनी आपल्यावरील कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


1भायखळा महिला कारागृहात कैदी मंजुळा शेट्ये हिची अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी तुरुंगाधिकारी पोखरकर हिच्यासह ६ महिला रक्षकांना अटक झाली असून, कारवाई
सुरू आहे.
2राज्यभरात चर्चेचा विषय बनलेल्या या प्रकरणात तुरुंग उपमहानिरीक्षक स्वाती साठे या संबंधित आरोपींना वाचविण्यासाठी मोबाइल व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवरून अधिकारी-कर्मचाºयांना मेसेज करून सहकाºयांना वाचविण्याचे आवाहन करत आहेत. त्याचप्रमाणे या खटल्यातील कामासाठी निधी गोळा करत असल्याची तक्रार हिरालाल जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यानिशी केली आहे. त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांकडेही ते पोहचविण्यात आले.
3या प्रकरणामुळे कारागृहातील सुरक्षा व अधिकाºयांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. साठे यांच्या विरुद्धच्या तक्रारीची वरिष्ठ अधिकाºयांकडून चौकशी सुरू आहे.

Web Title: Suspended prisoner inquiry still remained!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.