Join us

मनसेच्या दोन नगरसेविकांचे निलंबन

By admin | Published: April 16, 2016 3:03 AM

मुंबई महापालिकेच्या निवडणुंकांचे रणशिंग फुंकले गेले असतानाच आता शिवसेना आणि मनसेमधील संघर्ष पुन्हा पेटला आहे. प्रभाग समितीच्या नुकत्याच झालेल्या अध्यक्षपद

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुंकांचे रणशिंग फुंकले गेले असतानाच आता शिवसेना आणि मनसेमधील संघर्ष पुन्हा पेटला आहे. प्रभाग समितीच्या नुकत्याच झालेल्या अध्यक्षपद निवडणुकीत मनसेच्या दोन महिला नगरसेविकांनी शिवसेनेला मतदान केल्याने या दोन्ही नगरसेविकांचे मनसेने पक्षातून निलंबन केले आहे. गीता श्रीकृष्ण चव्हाण आणि सुखदा राहुल पवार अशी निलंबित नगरसेविकांची नावे आहेत. सध्या तरी या दोघी नगरसेविकांचे पद कायम राहणार असले तरी दोघी शिवसेनेची वाट धरणार? की अपक्ष राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.शिवसेना आणि मनसेमध्ये शीतयुद्ध आधीपासून सुरुच आहे. महापालिकेच्या कारभारात दोन्ही पक्षांमधील वाद नेहमीच उफाळून येतो. पक्षातंर्गत हेवेदावे तर नेहमीचेच असून, लोकप्रतिनिधींमध्ये पेटलेला हा वाद अधिक तीव्र झाला आहे. मनसेकडून दोन महिला नगरसेवकांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाबाबत मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी सांगितले, की मागील आठवड्यात प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूका झाल्या होत्या. यावेळी या दोन्ही महिला नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केले. परिणामी या दोन्ही नगरसेविकांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. मनसेने कोकण विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात या नगरसेविकांचे पद रद्द करावे , अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)पद रद्द करण्याची मागणीमागील आठवड्यात प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूका झाल्या होत्या. यावेळी या दोन्ही महिला नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केले. परिणामी या दोन्ही नगरसेविकांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.मनसेने कोकण विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात दोन्ही नगरसेविकांचे पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी केलेली आहे.