ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - मुंबई मेट्रोची भाडेवाढ तूर्तास पुढे ढकली असून येत्या २९ जानेवारीपर्यंत तरी मेट्रोचे दर 'जैसे थे'च राहणार आहेत. आज मुंबई हायकोर्टाने मुंबईकरांना तात्पुरता दिलासा दिला आहे. एमएमआरडीएच्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत मेट्रोची दरवाढ करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. याप्रकरणाची सुनावणी आता २९ जानेवारीला होणार आहे. या निर्णयामुळे मेट्रोच्या प्रवाशांना सध्या दिलासा मिळाला असला तरी भाडेवाड संदर्भातील अंतीम निर्णय जानेवारीच्या शेवटी होणार आहे. त्याआधी मेट्रोने भाववाढ करु नये असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मेट्रो तिकीट दर निश्चिती समितीने केलेल्या शिफारसींनुसार मेट्रोला तिकीट दरांमध्ये १० ते ११० रुपयांपर्यंत दरवाढ करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, एमएमआरडीएने त्यावर आक्षेप घेत हायकोर्टात धाव घेतली आहे.
सध्या घाटकोपर ते वर्सोवा - ११० रुपये येवढे तिकिट आहे, सुधारित प्रस्तावात १६० रुपये होण्याची शक्यता आहे.