ड्रग तस्कर बकुलचे पोलिसांशी ‘कनेक्शन’, ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:10 AM2017-12-13T02:10:59+5:302017-12-13T02:11:44+5:30

कोकेन, एलएसडी डॉट या अंमली पदार्थासह रंगेहात पकडलेला तस्कर बकुल हंसराज चंद्रिया (वय ४६, हंसराज चंद्रिया रा. विला मारिया, चौदावी गल्ली, खार प.) याचे बॉलीवूडच्या तारे-तारकांसह काही पोलीस अधिका-यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यांच्याशी ‘अर्थ’पूर्ण समझोत्यातून तो बिनधास्तपणे अंमली पदार्थाची विक्री करीत होता, असे सांगितले जात आहे.

Suspicion of 'connection' and 'meaning' connection with drug smugglers Bakul police | ड्रग तस्कर बकुलचे पोलिसांशी ‘कनेक्शन’, ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याचा संशय

ड्रग तस्कर बकुलचे पोलिसांशी ‘कनेक्शन’, ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याचा संशय

Next

मुंबई : कोकेन, एलएसडी डॉट या अंमली पदार्थासह रंगेहात पकडलेला तस्कर बकुल हंसराज चंद्रिया (वय ४६, हंसराज चंद्रिया रा. विला मारिया, चौदावी गल्ली, खार प.) याचे बॉलीवूडच्या तारे-तारकांसह काही पोलीस अधिका-यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यांच्याशी ‘अर्थ’पूर्ण समझोत्यातून तो बिनधास्तपणे अंमली पदार्थाची विक्री करीत होता, असे सांगितले जात आहे.
चंद्रिया हा उच्चभू्र मंडळी, तसेच ‘सेलिब्रिटी’ यांना अंमली पदार्थाचा पुरवठा करण्याचे काम करीत होता. त्यांच्या पार्टीमध्ये तो नेहमी सहभागी होत असे. शनिवारी रात्री अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान कक्षाने त्याच्या फ्लॅटवर छापा टाकला. त्यामध्ये ८ लाख ४८ हजार रुपये किमतीचे १०६ ग्रॅम कोकेन, ४ लाखांचे ९० एल. एस. डॉट व अन्य अंमली पदार्थ जप्त केले. बकुल हा नेहमी बॉलीवूडमधील तारे-तारकांसह दिसतो, त्याने रणबीर कपूर, सलमान खान, अभय देओल यांच्यासह अनेक कलाकारांसोबतचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. आता त्याच्या पोलिसांशी असलेल्या ‘कनेक्शन’ची चर्चा आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याचे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.

कारवाई होणार का?
बकुलचे स्थानिक खार पोलीस ठाण्यातील काही अधिकाºयांसह फोटो प्रसिद्ध झाले आहेत. सुमारे दोन महिन्यांपूर्वी ट्रॅफिक विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारे पोलीस हवालदार सुनील टोके यांनी त्याबाबतची माहिती पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे सादर केली होती. बकुल याच्या अटकेनंतर आता तरी संबंधित पोलिसांवर कारवाई होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Suspicion of 'connection' and 'meaning' connection with drug smugglers Bakul police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई