अंड्यांच्या दर्जावर संशय, पोलिसांत गुन्हा दाखल, एफडीएकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 11:53 PM2020-01-05T23:53:30+5:302020-01-05T23:53:33+5:30

महापालिकेच्या आर मध्य व आर उत्तरच्या प्रभाग समिती अध्यक्ष संध्या विपुल दोशी यांनी कांदिवली पश्चिम, चारकोप सेक्टर ८ येथे सुमारे ४ हजार भेसळयुक्त अंड्यांचे दोन टेम्पो शिवसैनिकांच्या मदतीने नुकतेच पकडले

Suspicion of egg grade, crime registered with police, prosecution by FDA | अंड्यांच्या दर्जावर संशय, पोलिसांत गुन्हा दाखल, एफडीएकडून कारवाई

अंड्यांच्या दर्जावर संशय, पोलिसांत गुन्हा दाखल, एफडीएकडून कारवाई

Next

मनोहर कुंभेजकर 
मुंबई : महापालिकेच्या आर मध्य व आर उत्तरच्या प्रभाग समिती अध्यक्ष संध्या विपुल दोशी यांनी कांदिवली पश्चिम, चारकोप सेक्टर ८ येथे सुमारे ४ हजार भेसळयुक्त अंड्यांचे दोन टेम्पो शिवसैनिकांच्या मदतीने नुकतेच पकडले असून, ते चारकोप पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर अंडी ही चायनिज असून ती प्लॅस्टिकची असल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी दोन टेम्पोंना सील ठोकले आहे. येत्या १५ दिवसांत याचा अहवाल सादर केला जाणार आहे.
कांदिवली पश्चिम चारकोप सेक्टर २ येथे एकांत सोसायटीत राहणाऱ्या अनुज केशव भुवड यांना येथील अनधिकृत कोंबडीच्या दुकानाच्या महिला विक्रेत्यांकडून गेले काही दिवस अंडी खरेदी करताना अंड्यात तफावत आढळली. भुवड यांनी अंडी खरेदी केल्यावर त्यांना ही अंडी भेसळयुक्त आढळली. या वेळी भुवड व दुकानदार यांच्यातील शाब्दिक बातचीत येथे आलेल्या आर-मध्य व आर-उत्तरच्या प्रभाग समिती अध्यक्षा संध्या विपुल दोशी व त्यांचे पती विपुल दोशी यांनी ऐकली. त्यांनी सदर विक्रेत्याला जाब विचारला. त्यानंतर अंडी सप्लायरच्या सुमारे दोन टेम्पोंमधील ४ हजार अंडी दोशी दाम्पत्याने व शिवसैनिकांनी ताब्यात घेतली. चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस सुरुवातीला तक्रार घेत नव्हते. संध्या दोशी यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे सदर भेसळयुक्त अंड्यांची तक्रार केली. त्यांनी आपले दोन अधिकारी घटनास्थळी पाठवले. चारकोप पोलिसांनी या अंड्यांचे ट्रक सील केले. १५ दिवसांत याचा अहवाल सादर केला जाणार आहे.
केशव भुवड यांना अंड्यात प्लॅस्टिकसारखा तरल पदार्थ आढळला. तसेच अंडे फोडल्यावर त्यांना नेहमीसारखा उग्र दर्प आला नाही. त्यामुळे त्यांनी चारकोप सेक्टर ८च्या नाक्यावरील अंडे विक्रेत्याला जाब विचारला. मात्र आम्ही अंडी घरी बनवत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे अंडी विक्रेत्याने दिली. सदर भेसळयुक्त अंडी ही नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक असून यावर कारवाई करावी, अशी तक्रार भुवड यांनी चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल शिंदे यांच्याकडे केली आहे.

Web Title: Suspicion of egg grade, crime registered with police, prosecution by FDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.