डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 07:51 AM2024-11-05T07:51:03+5:302024-11-05T07:51:20+5:30

Mumbai Crime News: एका अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी गोळ्या खाल्ल्या. संबंधानंतर काही तासाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी डी. बी मार्ग पोलिस अधिक तपास करत आहे. 

Suspicious death of diamond company manager, what exactly happened in 'that' room at Grantroad? | डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?

डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?

 मुंबई  - गुजरातच्या एका डायमंड कंपनीत काम करणाऱ्या मॅनेजरच्या हॉटेलच्या खोलीत झालेल्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी गोळ्या खाल्ल्या. संबंधानंतर काही तासाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी डी. बी मार्ग पोलिस अधिक तपास करत आहे. 

मूळची गुजरातची रहिवासी असलेल्या १४ वर्षीय मुलीच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यावेळी एका डायमंड कंपनीच्या ४१ वर्षीय मॅनेजरने तिला आर्थिक मदत केली. तसेच मदतीच्या बहाण्याने तिच्या घरी ये-जा सुरू होती. शनिवारी मुलीला फिरण्यासाठी मुंबईत घेऊन आला. बनावट आधारकार्डद्वारे एका ग्रँटरोडच्या हॉटेलमध्ये नेले. तेथे काही गोळ्या खाऊन त्याने मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तो बेशुद्ध पडल्याने मुलीने तेथील कर्मचाऱ्यांना कळवले. घटनेची वर्दी लागताच डी.बी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच त्यांनी कुठल्या गोळ्या खाल्ल्या? यादेखील फॉरेन्सिकला पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे, मुलीच्या तक्रारीवरून मयत व्यक्तीविरुद्ध पोक्सो, लैंगिक अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या खोलीत नेमके काय घडले? याचा शोध पोलिस घेत आहे. 

मुलीच्या कार्डवर हॉटेलमध्ये एन्ट्री ...
मयत व्यक्तीचे लग्न झाले असून त्याला १७ वर्षांची मुलगी आहे. त्याच्या मुलीचे तसेच यातील  पीडित मुलीचे नाव सारखे आहे. त्याने स्वतःच्या १७ वर्षाच्या मुलीच्या आधारकार्डवर एन्ट्री केल्याचेही तपासात समोर  आले आहे.

Web Title: Suspicious death of diamond company manager, what exactly happened in 'that' room at Grantroad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.