संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाला अटक
By admin | Published: September 16, 2015 01:13 AM2015-09-16T01:13:21+5:302015-09-16T01:13:21+5:30
अतिरेक्यांच्या टार्गेटवर असलेल्या मुंबईमध्ये काळात कुठल्याही प्रकारचा घातपात होऊ नये, म्हणून मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. अशा वेळी एक तरुण मस्जीद बंदर येथील झकारिया
मुंबई: अतिरेक्यांच्या टार्गेटवर असलेल्या मुंबईमध्ये काळात कुठल्याही प्रकारचा घातपात होऊ नये, म्हणून मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. अशा वेळी एक तरुण मस्जीद बंदर येथील झकारिया मस्जीद येथे संशयितपणे वावरताना आढळला. नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी या तरुणाला अटक करून पुढील चौकशीसाठी एटीएसकडे सोपवले आहे.
या परिसरात अतिरेकी आल्याच्या अफवेने परिसरात बराच काळ तणावपूर्ण परिस्थिती होती. बॉम्बशोधक पथकाद्वारे मस्जीदसह आसपासचा परिसर पिंजून काढला. मात्र तेथे कुठल्याही प्रकारची संशयित वस्तू सापडली नाही. पायधुनी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सोनू सिंग (२७) असे या तरुणाचे नाव असून, तो पायधुनी येथील कंपनीमध्ये ज्युनियर अकाउंटंट म्हणून काम करतो. सिंगने चार वेळा सीएची परीक्षा दिली. मात्र चारही वेळा अपयशच हाती आल्याने तो नैराश्यात होता, अशी माहिती मिळाली. प्राथमिक खातरजमा करून पायधुनी पोलिसांनी सिंगवर १५१(१) कलमान्वये कारवाई केली. हा तरुण रेकी करण्यास तर आला नव्हता ना, अथवा त्याचे अतिरेक्यांशी काही संबंध आहे का, याच्या चौकशीसाठी एटीएसकडे हस्तांतरित केले आहे.