मुंबईच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढ

By Admin | Published: September 22, 2015 02:15 AM2015-09-22T02:15:25+5:302015-09-22T02:15:25+5:30

पावसाळा वगळता पुढील आठ महिने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत एकूण १४ लाख दशलक्ष लीटर्स पाणीसाठा आवश्यक असतो

Sustainable growth in Mumbai's reservoir | मुंबईच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढ

मुंबईच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढ

googlenewsNext

मुंबई : पावसाळा वगळता पुढील आठ महिने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत एकूण १४ लाख दशलक्ष लीटर्स पाणीसाठा आवश्यक असतो. त्यातही हा जलसाठा जर १२ लाख दशलक्ष लीटर्सवर आला तर मुंबईला पाणीकपातीचे संकट सतावत नाही.
गणेश चतुर्थीपासून जालेल्या पावसाने जलसाठा वाढला आहे. आता तर सातही तलावांतील एकूण जलसाठा सोमवारी अखेर ११ लाख ७ हजार ४११ दशलक्ष लीटर्सवर पोहोचला आहे. परिणामी, पुढील ८ दिवस तलाव क्षेत्रात पावसाने हा वेग कायम ठेवला तर हा जलसाठा १२ लाख दशलक्ष लीटर्स एवढा होण्याची चिन्हे आहेत. शिवाय मोडक सागर ओव्हरफ्लो झाले असून, मध्य वैतरणाची पातळी वाढते आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मुंबईवरील २० टक्के पाणीकपात मागे घेण्यात प्रशासन सकारात्मक पावले उचलेल, अशी आशादायी चिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Sustainable growth in Mumbai's reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.