मुंबई: नाणार प्रकल्प बचाव समितीची मुंबई मराठी पत्रकार संघातील उधळण्यात आली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि नाणार प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीनं ही पत्रकार परिषद उधळून लावली. यावेळी आझाद मैदान पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सरकार आणि कंपनीनं दलाल पाठवल्याची प्रतिक्रिया संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी व्यक्त केली आहे. तर प्रकल्पाला असलेला विरोध हा लोकांचा नसून तो राजकीय स्वरुपाचा आहे, असं पत्रकार परिषद घेणाऱ्या अजयसिंह सेंगर म्हटलं. कोकणात या प्रकल्पामुळे १ लाख रोजगार निर्माण होणार असल्यानं शिवसेना व मनसे या पक्षांनी प्रकल्पास विरोध करू नये, असं आवाहन सेंगर यांनी केलं आहे.