स्वच्छ भारत अभियान; मुंबईकरांसाठी पालिकेची १,१६८ सामुदायिक शौचालये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 02:30 AM2020-11-30T02:30:12+5:302020-11-30T02:30:46+5:30

५७७ सामुदायिक शौचालयांमध्ये १३,९९८ शौचकुपे बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

Swachh Bharat Abhiyan; BMC's 1,168 community toilets for Mumbaikars | स्वच्छ भारत अभियान; मुंबईकरांसाठी पालिकेची १,१६८ सामुदायिक शौचालये

स्वच्छ भारत अभियान; मुंबईकरांसाठी पालिकेची १,१६८ सामुदायिक शौचालये

Next

मुंबई : मुंबईमध्ये  ७ हजार २१२ शौचालयांमध्ये ८७ हजार ४२२ शौचकुपे वापरात आहेत. तर हगणदारीमुक्‍त मुंबईसाठी मुंबई महापालिका १ हजार १६८ सामुदायिक शौचालये बांधणार आहे.

मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मुंबई शहर हगणदारीमुक्‍त करण्यासाठी वस्‍ती स्‍वच्‍छता कार्यक्रम विभागामार्फत एकूण १ हजार १६८ सामुदायिक शौचालयांमध्ये २२ हजार ७७४ शौचकुपे बांधणे प्रस्तावित आहेत. त्यापैकी १३९ सामुदायिक शौचालयांमध्ये २ हजार ८२० शौचकुपे बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच ५७७ सामुदायिक शौचालयांमध्ये १३,९९८ शौचकुपे बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

उघड्यावर शाैच करणाऱ्यांना कारवाईचा बडगा दाखविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. अशा लाेकांना शंभर रुपये दंड करण्यात आला. क्लीनअप मार्शलमार्फत ही कारवाई करण्यात आली. बैठका, पथनाट्य अशा विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली, मात्र मुंबई अद्याप हगणदारीमुक्त झाली नसल्याचे चित्र आहे.

सार्वजनिक शौचालय

  • सार्वजनिक शौचालयातील ४ पैकी केवळ १ शौचालय स्त्रियांसाठी असे प्रमाण २०१८मध्ये दिसून आले.
  • १००-४०० पुरुषांसाठी १ आणि १००-२०० महिलांसाठी १ या प्रमाणात शौचालये पाहिजेत.
  • एका सार्वजनिक शौचालयाचा वापर ६९६ पुरुष करतात.
  • एका शौचालयाचा वापर १ हजार ७६९ महिला करतात.

 

२०१५ मधील शौचालयांची स्थिती

  • २८ टक्के शौचालये पाइपद्वारे मलनिस्सारणाच्या व्यवस्थेशी जोडलेली होती.
  • ७८ टक्के शौचालयांतील नळजोडणीबाबत सुस्पष्ट माहिती उपलब्ध नव्हती.
  • ५८ टक्के शौचालयांमध्ये वीज नव्हती.
     

झोपडपट्टी/वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांची संख्या (टक्केवारीत)

  • अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व, विलेपार्ले - ४९ टक्के
  • मालाड, मालवणी - ५४ टक्के
  • कांदिवली ५८ - टक्के
  • देवनार, गोवंडी, मानखुर्द - ३० टक्के
  • भांडुप - ७२ टक्के
  • वांद्रे पश्चिम - ३९ टक्के
  • सायन, किंग्ज सर्कल, दहिसर, कांदिवली, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला - ५० टक्के

Web Title: Swachh Bharat Abhiyan; BMC's 1,168 community toilets for Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.