Swachh Survekshan 2021 Mumbai: मुंबईनं मारली बाजी! स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत मिळवला अव्वल क्रमांक; घनकचरा व्यवस्थापनात नावीन्यपूर्ण कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 08:48 PM2021-11-20T20:48:19+5:302021-11-20T20:49:08+5:30

केंद्र सरकारमार्फेत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या श्रेणीत मुंबई महापालिकेला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे.

swachh survekshan 2021 mumbai corporation tops in solid waste management | Swachh Survekshan 2021 Mumbai: मुंबईनं मारली बाजी! स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत मिळवला अव्वल क्रमांक; घनकचरा व्यवस्थापनात नावीन्यपूर्ण कामगिरी

Swachh Survekshan 2021 Mumbai: मुंबईनं मारली बाजी! स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत मिळवला अव्वल क्रमांक; घनकचरा व्यवस्थापनात नावीन्यपूर्ण कामगिरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - केंद्र सरकारमार्फेत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या श्रेणीत मुंबई महापालिकेला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनातील नावीन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी' साठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे शनिवारी झालेल्या समारंभात, गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी हा पुरस्कार प्रदान केला.  महापालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संगीता हसनाळे, उपायुक्त (परिमंडळ ७) भाग्यश्री कापसे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) अशोक यमगर, कार्यकारी अभियंता (स्वच्छ भारत अभियान) अनघा पडियार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याकडून दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी स्पर्धेत, ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांच्या श्रेणीमध्ये मुंबई महापालिकेने आपले वर्चस्व पुन्हा दाखवून दिले.

* सुमारे ४७५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या मुंबई महानगरात दीड कोटीहून अधिक लोकसंख्या वास्तव्यास आहे. मुंबईत जवळपास दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. 

* मुंबई महानगराला लागून असलेल्या इतर शहरांमधून दररोज नोकरी-व्यवसाय निमित्ताने कोट्यवधी नागरिक ये-जा करतात. त्यामुळे दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन करण्याचे अवाढव्य लक्ष्य महानगरपालिका प्रशासनासमोर असते. 

* वार्षिक सरासरी सुमारे सहा हजार १०० मेट्रिक टन घनकचऱ्याचे व्यवस्थापन मुंबईत केले जाते. हे व्यवस्थापन सुलभ आणि पर्यावरणस्नेही व्हावे म्हणून महापालिकेने अनेक पावले उचलली आहेत. 

* मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून लोकसहभाग वाढवला आहे. या सर्व कामगिरीची दखल घेऊन महापालिकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Web Title: swachh survekshan 2021 mumbai corporation tops in solid waste management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.