‘स्वच्छता ही सेवा’ बनला पक्षीय उपक्रम; मुंबईतील १७८ ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 11:46 AM2023-10-02T11:46:40+5:302023-10-02T11:46:54+5:30

एकीकडे विरोधी पक्षांकडून त्याकडे सपशेल पाठ फिरवली गेली असतानाच महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांनीही आपापले श्रमदान आपापल्या नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केले.

'Swachhta Hi Seva' became a party initiative; Sanitation through labor donation at 178 locations in Mumbai | ‘स्वच्छता ही सेवा’ बनला पक्षीय उपक्रम; मुंबईतील १७८ ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता

‘स्वच्छता ही सेवा’ बनला पक्षीय उपक्रम; मुंबईतील १७८ ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता

googlenewsNext

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी ‘स्वच्छता ही सेवा’ हा एक तास श्रमदानाचा मुंबई स्वच्छ करण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवला गेला खरा; पण त्यामुळे पक्षीय मतभेदांची जळमटे काही स्वच्छ झाली नाहीत. एकीकडे विरोधी पक्षांकडून त्याकडे सपशेल पाठ फिरवली गेली असतानाच महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांनीही आपापले श्रमदान आपापल्या नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव चौपाटी श्रमदान केले, त्यावेळी त्यांच्या गटाचे दीपक केसरकर हे मुंबई शहरचे पालकमंत्री सहभागी झाले होते. भाजपा नेते आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे शिवडी किल्ला येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपस्थित होते. त्यांच्या पक्षाचे दुसरे सहकारी व विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही तिथे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेतील सहभागी गटाचे नेते अजित पवार यांनी श्रमदानासाठी बारामतीची निवड केली. त्यांच्या गटाच्या अन्य मंत्र्यांच्या सहभागाची माहिती मिळू शकली नाही. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात श्रमदान केल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

मुंबईत १७८ ठिकाणी राबवण्यात आलेल्या मोहिमेत  लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, गणेश मंडळे, सहकारी गृहनिर्माण संस्था, मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार या मोहिमेत सहभागी झाले होते.

स्वच्छता स्वयंसेवकांच्या जोडीने अनेक संस्थाही मोहिमेत  उतरल्या होत्या. स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आलोक कुमार स्वत: त्यांच्या कर्मचाऱ्यांसह आले होते. याशिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, एनसीसी, गुरुनानक हायस्कूल, नवनीत कॉलेज, सागरी सीमा मंच, उत्कल सेवा समिती, नॅशनल हौसिंग बँक, सेंट झेव्हियर्स कॉलेज तसेच पोलिस, होमगार्डस, महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी मोहिमेत भाग घेतला.  एमएमआरडीएने बीकेसी तसेच मेट्रो २-अ आणि ७ वरील स्थानकांवर स्वच्छता मोहीम राबवली. 

  गिरगाव चौपाटी येथे बोलताना, पंतप्रधान  नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे, स्वच्छता हा काही केवळ एक दिवस आणि कुणीतरी एकानेच राबविण्याचा उपक्रम नाही, तर ती नेहमीसाठीची आपली जीवनशैली असली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

   कलाकार सलीम खान,  अनुपम खेर, सुनील शेट्टी, तुषार कपूर,  अरबाज खान, वंदना गुप्ते, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, हर्षदा खानविलकर,  सुबोध भावे, श्रेयस तळपदे, सुनील बर्वे, संजय नार्वेकर, स्वप्निल जोशी, अरुण नलावडे, जयवंत वाडकर, प्रदीप कबरे आदी सहभागी होते.

Web Title: 'Swachhta Hi Seva' became a party initiative; Sanitation through labor donation at 178 locations in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.