बांधकाम व्यावसायिकांना ‘स्वामी’ प्रसन्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 05:37 AM2020-07-26T05:37:35+5:302020-07-26T05:37:41+5:30

१८ प्रकल्पांसाठी ८,७६७ कोटींचा निधी । मुंबई, ठाणे, पुण्याच्या सहा कामांचा समावेश

'Swami' pleased builders! got 8767 crore for 18 projects | बांधकाम व्यावसायिकांना ‘स्वामी’ प्रसन्न!

बांधकाम व्यावसायिकांना ‘स्वामी’ प्रसन्न!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात बंद पडलेल्या बांधकाम प्रकल्पांमध्ये ऊर्जा फुंकण्यासाठी स्पेशल विंडो फॉर अफोर्डेबल अ‍ॅण्ड मिड इन्कम हाउसिंग फंडाचे (स्वामी) दार केंद्र सरकारने उघडले आहे. गेल्या काही दिवसांत रखडलेल्या ८१ प्रकल्पांसाठी ८ हजार ७६७ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर झाले आहे. त्यातून ६० हजार घरांचे काम मार्गी लागेल. त्यात मुंबईतील चार आणि ठाणे, पुण्यातील प्रत्येकी एक प्रकल्प आहे. योजनेअंतर्गत सर्वाधिक निधी महाराष्ट्रातील प्रकल्पांना प्राप्त झाला आहे.
मध्यम आकाराच्या आणि परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांमध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्यास त्या दूर करण्यासाठी नोव्हेंबर, २०१९ मध्ये केंद्र सरकारने स्वामी फंड उभारण्यास मान्यता दिली होती. त्यातून पहिल्या टप्प्यात किमान २५ हजार कोटी रुपये बांधकाम व्यावसायिकांना उपलब्ध होतील, अशी आशा आहे. कोरोना संकटकाळात हा निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटना गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
गेल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी देशातील प्रकल्पांसाठी पाच हजार कोटींचे अर्थसाहाय्य दिले असून त्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. मात्र, या निधीपेक्षा स्वामी फंडातील पैसे अधिक उपयुक्त ठरतील, असे या संघटनांचे म्हणणे आहे. त्याची दखल घेत केंद्र सरकारने या निधीच्या वितरणास सुरुवात केली आहे.


मदतीसाठी केंद्र सरकारला साकडे
रिव्हाली पार्क (बोरीवली), नमन प्रीमियर (अंधेरी), जेम पॅराडाइज (अंधेरी), विंडस्पेप अमोलिओ डी.एन. नगर, मुंबई, अप्पर ठाणे (ठाणे), प्लेटोप रांजणगाव (पुणे) अशी अर्थसाहाय्य मंजूर झालेल्या महाराष्ट्रातील बांधकाम प्रकल्पांची नावे आहेत.
मंजुरी मिळालेल्या १८ पैकी सात प्रकल्पांना निधीचे वितरणही झाले आहे. तर, या योजनेअंतर्गत साहाय्य मिळविण्यासाठी ३५३ प्रकल्पांचे अर्ज केंद्र सरकारकडे दाखल झाले आहेत. त्याबाबतचे टिष्ट्वट देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.

Web Title: 'Swami' pleased builders! got 8767 crore for 18 projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.