मुंबई : यूपीएसई- एनडीए-२०२० परीक्षेत देशपातळीवरील गुणवत्ता यादीत अंधेरीच्या स्वराज घोसाळकर याची प्रथम प्रयत्नात १४९ व्या क्रमांकावर निवड झाली आहे. स्वराज घोसाळकरचे उच्चशिक्षित पालक म्हणून समाजसेविका आई सुरक्षा घोसाळकर, उद्योजक वडील शशांक घोसाळकर आणि त्यांच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे. सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
बहुतांशी पालक इयत्ता दहावीमध्ये करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशनाची धावपळ करतात. परंतु स्वराजच्या पालकांनी त्याच्या जन्मापासून सैनिक अधिकारी होण्यासाठी पूर्व नियोजन केले होते. शिक्षक, मार्गदर्शक आणि पालक यांच्या मार्गदर्शनामुळे स्वराजने केंद्रीय विद्यालय आयआयटी, पवई शाळेत इयत्ता दहावी सीबीएसई बोर्डात ९२ टक्के गुण प्राप्त केले. अभ्यासासोबत धनुर्विद्येत राष्ट्रीय पातळीवर रौप्य पदक, स्काउटचा राज्य पुरस्कार मिळवला आहे. आई-वडील, आजीचे संस्कार आणि घडवणाऱ्या शिक्षकांमुळे मला हे यश मिळल्याचे स्वराज घोसाळकरने सांगितले.
फोटो आहे - स्वराज घोसाळकर