Join us  

‘स्वरानंदवन’ कार्यक्रमाने मुग्ध

By admin | Published: December 12, 2014 10:46 PM

बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘स्वरानंदवन’ कार्यक्रम अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये झाला.

अलिबाग : बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘स्वरानंदवन’ कार्यक्रम अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये झाला. 
डॉ. विकास बाबा आमटे यांची निर्मिती आणि दिग्दर्शित असलेल्या या कार्यक्रमाचे प्रथमच अलिबागमध्ये आयोजन नीलेश विनायक कंटक आणि अलिबाग मित्र परिवार यांनी केले होते. यात अंध, अपंग, मूकबधिर आणि कुष्ठरोगमुक्त झालेल्यांचा समावेश होता. याच कार्यक्रमात मुग्धा वैशंपायन आणि मधुरा वेलणकर-साटम याही सहभागी झाल्या होत्या.
कलाकारांच्या कलेने उपस्थित प्रेक्षकांना चांगलेच मंत्रमुग्ध केले. त्यांच्या कलेला टाळ्य़ांच्या कडकडाटाने सलाम ठोकला.नीलेश कंटक यांचे विशेष आभार मानले. याप्रसंगी डॉ.विकास आमटे, डॉ.भारती आमटे, जेएसएमचे प्राचार्य अनिल पाटील, शेखर नाईक, प्रा. सुरेंद्र दातार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
अंध, अपंग, मूकबधिर अशा कलाकारांनी सादर केलेल्या विविधांगी अशा कलेला सा:यांनीच प्रतिसाद दिला. यावेळी कोणत्याही प्रकारचे अपंगत्वाचे ओङो न बाळगता कलाकारांनी उत्स्फूर्तरीत्या कार्यक्रमाचे सादरीकरण यावेळी केले.