पीपीई किटमध्ये घामाघूम, तरीही रुग्णसेवा अविरत सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 05:33 AM2021-05-07T05:33:29+5:302021-05-07T05:34:05+5:30

सध्या सोलापुरात चाळीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान आहे.

Sweating in the PPE kit, yet patient care continues unabated | पीपीई किटमध्ये घामाघूम, तरीही रुग्णसेवा अविरत सुरू

पीपीई किटमध्ये घामाघूम, तरीही रुग्णसेवा अविरत सुरू

googlenewsNext

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी डॉक्टरांची मोठी फळी दिवस-रात्र मेहनत घेत आहे. एप्रिलमध्ये सूर्यही कोपला आहे. राज्यात उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा स्थितीत सामान्यही घामाघूम होत आहेत. पीपीई किमध्ये डॉक्टरांचे काय हाल होत असतील, याची कल्पना न केलेलीच बरी. पण तरीही या योद्ध्यांची लढाई थांबलेली नाही. 

सध्या सोलापुरात चाळीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना सलग सहा तास पीपीई किट परिधान करून कोरोना रुग्णांवर उपचार करीत असलेल्या यांच्यासारख्या कोरोना योद्ध्यांना सलाम.

महाराष्ट्राची कोरोनास्थिती
राज्यात गुरुवारी ६२ हजार १९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून बरे होऊ घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या ६३ हजार ८४२ एवढी होती. ८५३ बाधितांचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ४२ लाख २७ हजार ९४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Web Title: Sweating in the PPE kit, yet patient care continues unabated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.