Join us

मिठाईलाही महागाईची झळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 1:04 AM

दिवाळीत दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूमध्ये मिठाई अग्रक्रमांकावर असते. महागाईची झळ मिठाईला बसणे स्वाभाविकच आहे.

मुंबई : दिवाळीत दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूमध्ये मिठाई अग्रक्रमांकावर असते़ महागाईची झळ मिठाईला बसणे स्वाभाविकच आहे. या वर्षी मिठाईचे दर १० टक्क्यांनी वाढले आहेत़, तरीही तुपातल्या मिठाईला ग्राहकांची सर्वाधिक पसंती असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे़तुपाची विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तुपापासून मिठाई आणि फराळ बनविले जाते. त्यात गाईच्या दुधापासून बनविल्या जात असलेल्या तुपाला जास्त मागणी आहे. त्यामुळे तुपातल्या मिठाईला सर्वाधिक मागणी असल्याचेही दादरच्या मिठाई विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे यंदा दिवाळीच्या फराळासह मिठाईवरही महागाई आली आहे.या वर्षी मिठाईचे भाव ५०० ते ९०० रुपये किलो प्रमाणे वाढले आहेत. मागच्या वर्षांच्या तुलनेत जवळजवळ सर्वच मिठायांच्या दरात वाढ झालेली आहे. मुंबईत शहरांतील दुधाचे दर प्रतिलीटर २ रुपयांनी वाढले आहेत. परिणामी, दुधापासून तयार होणारी मावा बर्फी, रबडी, बासुंदी, श्रीखंड, बंगाली मिठाई, काजू कतली इत्यादी मिठायांचे दर वाढले आहेत. परदेशातून अंजीर आणि पिस्त्यांची आयात घटल्याने, सुक्या मेव्यापासून तयार होणारी बर्फीचे दर ६०० रुपये प्रतिकिलो दराने वाढले आहे.काजूच्या मिठाईमध्ये खवा, दुधासारखे पदार्थ नसल्याने ते जास्त दिवस टिकतात. दादरमध्ये सध्या काजूच्या मिठार्इंना बरीच पसंती मिळत आहे. १,१०० ते १,६०० रुपये दराप्रमाणे गोव्यातील काजू मिळतात. आम्ही गोवा आणि रत्नागिरीतून काजूची आयात करून मिठाई बनवितो. यात गोव्याच्या काजूचे दर जास्त आहेत. आमच्या इथे काजू कतलीला चांगली पसंती असून, वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही काजू कतली उपलब्ध आहेत. १,१०० ते १,२०० रुपये किलो दराने काजू कतली विकली जात आहे. महागाईमुळे ६ ते ७ टक्के मिठाईचे दर वाढले आहेत. ३ नोव्हेंबरपासून ग्राहकांची गर्दी सुरू होईल, अशी माहिती दादरच्या सामंत ब्रदर्सचे मालक तुषार सामंत यांनी दिली.रवा, बेसन लाडू ४४० ते ४८० रुपये किलो, काजू कतली ९४० ते ९८० रुपये किलो, ड्रायफ्रुट मिक्स मिठाई १ नंबर १२०० रुपये किलो, स्पेशल मलई मिक्स मिठाई २ नंबर ६८० रुपये, मिक्स मिठाई ३ नंबर ४८० रुपये किलो आणि ड्रायफु्रट बॉक्स ५०० रुपये किलो दराने किमती सुरू आहेत, तसेच बाजारात मिठाईचे भाव १० टक्क्यांनी वाढले आहेत, अशी माहिती लालबागच्या मुंबई लाडूसम्राटचे मालक बाबू राक्षे यांनी दिली.

टॅग्स :दिवाळी