Swiggy बॉय आहे 'अफलातून चित्रकार'; एका डिलिव्हरीनं आयुष्य बदललं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 08:44 PM2020-01-10T20:44:24+5:302020-01-10T20:52:19+5:30
विशालच्या चित्रांची दखल चक्क अभिनेत्री पूजा भट्ट आणि आयएएस अधिकारी नवीन कुमार चंद्रा यांनी घेतली आहे.
मुंबई - कोळशाच्या खाणीत जसा हिरा लखलखतो. तसाच विशाल समाजिस्कर हा एक सर्वसामान्य डिलेव्हरी बॉय त्याच्यातील कलाकारीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. तसं पाहायला गेलं तर विशाल हा अतिशय चांगला चित्रकार, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे तो स्विगी डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतो. माणसात असलेली कलात्मकता लपून राहत नाही. एका स्विगीला ऑर्डर केलेल्या व्यक्तीने Swiggy बॉय विशालचे आयुष्य बदलून टाकले आहे. विशालच्या चित्रांची दखल चक्क अभिनेत्री पूजा भट्ट आणि आयएएस अधिकारी नवीन कुमार चंद्रा यांनी घेतली आहे.
This is Vishal. He delivered my Swiggy order today. He's an artist and he is looking for work. Do let me know if you would like to get a painting/wall art commissioned. I can put you in touch with him. Do spread the word and help him out! pic.twitter.com/3HCMaYSuRx
— nikhiilist (@nikhiilist) January 6, 2020
स्विगीवर निखिलने पार्सल मागवले होते. निखिलची ऑर्डर डिलेव्हरी कारण्यासाठी विशाल गेला आणि त्याच नशीब बदललं. विशाल नेहमीप्रमाणे स्विगीची ऑर्डर घेऊन निखिलकडे गेला. त्यावेळी दोघांत थोडी चर्चा झाली. चर्चेदरम्यान विशालने आपण चांगला चित्रकार असल्याची मोलाची गोष्ट निखिलला सांगितली. विशालची कहाणी ऐकून निखिल चक्रावला आणि त्याने त्याच्या ट्विटरवरून ही माहिती सोशल मीडियावर वायरल केली.
@nikhiilist या ट्विटर अकाऊंटवरून निखिलने एका हरहुन्नरी चित्रकाराची कहाणी सोशल मीडियाद्वारे कान्याकोपऱ्यात पोचवली. निखिलने या ट्विटसोबत विशालने काढलेली सुंदर चित्र देखील पोस्ट केली. या ट्विटला जवळपास १२ हजार लाईक्स तर ५ हजाराहून अधिक रिट्वीट करत पसंती मिळाली आहे. तसेच या ट्वीटवर जवळपास ६ हजार लोकांनी कमेंट केले आहे. विशालचे vishal _samjiskar नावाने इंस्टाग्रामवर अकाऊंट असून त्याला ३८५ लोकांनी फॉलोव्ह केले आहे.
पूजा भट्टने मागितला विशालचा कॉन्टॅक्ट नंबर
निखिलच्या या ट्वीटला जवळपास ६ हजार कमेंट आले असले तरी त्यापैकी आकर्षणाचा आणि महत्वाचं कमेंट हे अभिनेत्री पूजा भट्टचे आहे. पूजाने एका हरहुन्नरी चित्रकाराची दखल घेत त्याला संपर्क कसा साधता येईल ? असे कमेंट केले आहे. त्याचप्रमाणे आयएएस अधिकारी नवीन कुमार चंद्रा यांनी देखील कमेंट करत विशालला मालदा येथे अंगणवाडी केंद्र पेंटींगचे कामं देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी मोबदल्यात पैसे देणार असल्याचेही कमेंटमध्ये स्पष्ट केले आहे.
Yes please! 🙏 how does one connect with him?
— Pooja Bhatt (@PoojaB1972) January 7, 2020
त्याचप्रमाणे स्विगीने देखील निखिलचे फेसबुक आणि ट्विटरवर कलेला जिवंत ठेवल्याबद्दल आभार प्रकट केले आहेत.
Hey Nikhil, thank you for taking the time to bring this to our attention 😀 Talent should always be shared, appreciated and supported. It is great to know that such a talented artist is among us and we would want to do everything possible (cont) https://t.co/0Ch5otPksJ
— Swiggy Cares (@SwiggyCares) January 7, 2020
If he is willing to come to Malda, which we will pay for, we are looking for an artist to paint an Aaganwadi Centre here. Might not get paid as much but would be great exposure for his work.
— Naveen Kumar Chandra, IAS (@n_k_chandra) January 7, 2020