पनवेलमध्ये आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
By admin | Published: June 16, 2017 12:32 AM2017-06-16T00:32:52+5:302017-06-16T00:32:52+5:30
कामोठे शहरात स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला आहे. शहरातील एका महिलेला (वय जवळपास ६०) स्वाइन फ्लूची लागण झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : कामोठे शहरात स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला आहे. शहरातील एका महिलेला (वय जवळपास ६०) स्वाइन फ्लूची लागण झाली असून, ती पी अॅण्ड जे या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तालुक्यात यंदाच्या वर्षात आढळलेला स्वाइनचा हा पहिला रुग्ण असल्याची माहिती पनवेल ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. लोहारे यांनी दिली. या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
पनवेलमध्ये स्वाइन फ्लूची लागण होऊ नये म्हणून १५०पेक्षा जास्त रुग्णांना लसीकरण करण्यात आले आहे. या आजाराची लक्षणे साधारण तापाप्रमाणे असून सर्दी, जुलाब, उलट्या, अंगदुखी, खोकल्याची लागण झाल्यास दुर्लक्ष न करता त्वरित तपासणी करून घ्यावी व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन डॉ. लोहारे यांनी
केले आहे.