पाच वर्षांत स्वाइनचे ६१ बळी

By admin | Published: April 10, 2015 04:30 AM2015-04-10T04:30:12+5:302015-04-10T04:30:12+5:30

गेल्या पाच वर्षांत मुंबईत स्वाइन फ्लूमुळे ६१ जणांचा मृत्यू झाला असूनही स्वाइनसाठी स्वतंत्र निधी महापालिकेकडे नसल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे.

The swine has 61 victims in five years | पाच वर्षांत स्वाइनचे ६१ बळी

पाच वर्षांत स्वाइनचे ६१ बळी

Next

मुंबई : गेल्या पाच वर्षांत मुंबईत स्वाइन फ्लूमुळे ६१ जणांचा मृत्यू झाला असूनही स्वाइनसाठी स्वतंत्र निधी महापालिकेकडे नसल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे.
२०१० ते २०१४ या कालावधीत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या १ हजार ३०१ इतकी होती. तर याच काळात ३३ जणांचा मृत्यू झाला होता. २०१५ या वर्षांत पहिल्या तीन महिन्यांतच रुग्णांची संख्या १ हजार १५० इतकी झाली. म्हणजे गेल्या चार वर्षांच्या तुलनेत २०१५ मध्ये पहिल्या तीन महिन्यांतच रुग्णांची संख्या अधिक वाढली. २०१५ मध्ये आतापर्यंत पहिल्या तीन महिन्यांत मुंबईतील ८ आणि मुंबईबाहेरील २० जणांचा मृत्यू झाला आहे. ही गंभीर बाब असूनही स्वाइन फ्लूसाठी स्वतंत्र निधी नसल्याचेही माहितीच्या अधिकारात सांगण्यात आले. साथरोग नियंत्रण कक्षाकडे स्वाइनसाठी विशेष निधी देण्यात आलेला नाही.

Web Title: The swine has 61 victims in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.