Join us

मुंबईत स्वाइनचे नवे ४१ रुग्ण

By admin | Published: March 17, 2015 12:52 AM

मार्च महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होऊनही मुंबईत गारवा आहे. थंडीचे वातावरण विषाणूंना पोषक असल्यामुळे स्वाइनचा धोकाही वाढत आहे.

मुंबई : मार्च महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होऊनही मुंबईत गारवा आहे. थंडीचे वातावरण विषाणूंना पोषक असल्यामुळे स्वाइनचा धोकाही वाढत आहे. अजूनही स्वाइनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. सोमवार, १६ मार्चला मुंबईत स्वाइनचे नवे ४१ रुग्ण आढळून आले असून मुंबईबाहेरून तीन नवे रुग्ण दाखल झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत मुंबईत एकूण १ हजार १९१ स्वाइनचे रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईबाहेरून १५२ रुग्ण उपचारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरात लवकर उपचार घेतल्यास स्वाइन फ्लू पूर्णपणे बरा होतो. दोन ते तीन दिवसांहून अधिक काळ खोकला, सर्दी, ताप, घसा खवखवणे असा त्रास जाणवल्यास डॉक्टरचा सल्ला घ्या, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सोमवारी आढळलेल्या ४९ रुग्णांपैकी २२ पुरुष तर १९ महिला आहेत. २१ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून २० जण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेत आहेत. एक पुरुष आणि दोन महिला मुंबईत उपचारासाठी दाखल झाले आहेत. तिघांनाही उपचारासाठी दाखल केले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती साथरोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांच्याकडून मिळाली आहे.