घाटकोपर येथील ‘राजहंस सोसायटी’ एकतेचे प्रतीक

By admin | Published: March 11, 2016 03:00 AM2016-03-11T03:00:28+5:302016-03-11T03:00:28+5:30

‘समानता, एकता, प्रेम आणि विकास’ या चतु:सूत्रीवर वाटचाल करत विविध धर्माच्या, जातीच्या बांधवांना ३५ वर्षांपासून नात्यांच्या बंधनात बांधून ठेवण्याचे काम घाटकोपर येथील राजहंस सोसायटी करत

The symbol of the 'Rajhanshan Society' unity at Ghatkopar | घाटकोपर येथील ‘राजहंस सोसायटी’ एकतेचे प्रतीक

घाटकोपर येथील ‘राजहंस सोसायटी’ एकतेचे प्रतीक

Next

लीनल गावडे,  मुंबई
‘समानता, एकता, प्रेम आणि विकास’ या चतु:सूत्रीवर वाटचाल करत विविध धर्माच्या, जातीच्या बांधवांना ३५ वर्षांपासून नात्यांच्या बंधनात बांधून ठेवण्याचे काम घाटकोपर येथील राजहंस सोसायटी करत आहे. घाटकोपर पूर्व येथील घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील बसडेपोशेजारी ‘राजहंस’ सोसायटी वसलेली आहे.
सोसायटीची स्थापना १९८०मध्ये झाली. इथे चार मजल्यांच्या १० इमारती आहेत. सिमेंटच्या जंगलातील या सोसायटीत शिरल्यावर सर्वत्र हिरवळ आणि आंबा, जांभूळ, कडुनिंब, नारळ यांची तब्बल ७० ते ८० झाडे दिसतात.
सोसायटी ३५ वर्षे जुनी असली तरी नवनव्या योजना राबविण्याचा उत्साह रहिवाशांमध्ये कायमच असतो. याबद्दल राजहंस सोसायटीचे सचिव संग्राम शिंदे सांगतात की, कितीही खटके उडाले तरी नवीन योजना राबविण्यासाठी सोसायटी नेहमी उत्सुक असते. ‘पावसाचे पाणी साठवणे’, ‘कचऱ्याचे व्यवस्थापन’, कमीतकमी विजेचा वापर व्हावा यासाठी ‘एलईडी बल्ब’चा वापर अशा अनेक योजना सोसायटीतील रहिवाशांनी यशस्वीरीत्या राबविल्या आहेत.
सोसायटीत मकरसंक्रांत, गुढीपाडवा, गणेशोत्सव, ख्रिसमस, गÞुड फ्रायडे, ईद असे सर्वच सण-उत्सव उत्साहात साजरे केले जातात. सोसायटीच्या आवारात दत्त मंदिर असून, दत्तजयंतीचा सोहळा पाहण्यासारखा असतो. रोज संध्याकाळी रहिवासी एकत्र येऊन आरती म्हणतात. सोसायटीच्या आवारात स्टेज, कम्युनिटी हॉल असल्यामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सोसायटीतच होतात. कोणत्याही संकाटाच्या वेळी सोसायटीतील सर्व जण एकत्र येऊन समस्या सोडवतात. सर्व रहिवासी समाजाप्रति आपले कर्तव्य बजावण्याविषयी जागरूक आहेत. समानता, एकता, प्रेम आणि विकास या चतु:सूत्रीवर आधारलेली ‘राजहंस’ सोसायटी आदर्श सोसायटीचे उत्तम उदाहरण बनली आहे.

Web Title: The symbol of the 'Rajhanshan Society' unity at Ghatkopar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.