पुरातन लेणींवर संक्र ांत

By admin | Published: April 14, 2015 12:29 AM2015-04-14T00:29:32+5:302015-04-14T00:29:32+5:30

एकीकडे पश्चिम उपनगरांतील पुरातन लेणी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून, त्यांची दैनावस्था झाल्याची मुंबईकरांची नेहमी ओरड असते.

Synopsis of ancient caves | पुरातन लेणींवर संक्र ांत

पुरातन लेणींवर संक्र ांत

Next

मनोहर कुंभेजकर - मुंबई
एकीकडे पश्चिम उपनगरांतील पुरातन लेणी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून, त्यांची दैनावस्था झाल्याची मुंबईकरांची नेहमी ओरड असते. आता मुंबईच्या विकास आराखड्यात मुंबईतील ‘अ’ दर्जाच्या हेरिटेज पुरातन लेणींवरही संक्रांत आली आहे. मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यात पश्चिम उपनगरांतील अंधेरी (पूर्व) येथील महाकाली लेणी, जोगेश्वरी लेणी, बोरीवली (पूर्व) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी आणि बोरीवली (प.) येथील मंडपेश्वर लेणी या पुरातन बुद्ध लेण्यांच्या २०० मीटर परिघात रस्ते दाखवण्यात आले आल्याने लेण्यांच्या अस्तित्वाला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती वॉच डॉग फाउंडेशनचे ग्रॉडफ्रे पिमेंटा यांनी दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही माहिती समोर आल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पुरातन बुद्धिस्ट लेण्यांचा परिसर विकास आराखड्यातून न वगळल्यास तमाम आंबेडकरी जनता महापालिकेविरुद्ध तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा सामाजिक समता मंचचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. सर्वसमावेशकता नसल्याने हा विकास आराखडा अरबी समुद्रात फेकण्याची मागणी त्यांनी केली.
या नव्या विकास आराखड्यातील लेण्यांबाबत ग्रॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले की, या विकास आराखड्यातील २४ क्रमांकाच्या पृष्ठानुसार अंधेरीच्या महाकाली लेणींचा समावेश इतर सामाजिक सुविधांमध्ये करण्यात आला आहे. या लेणींच्या २०० मीटर परिघात ४० मीटरचा रुंद रस्ता दाखवण्यात आला आहे. या २०० मीटर परिघातील विस्थापितांचे पुनर्वसन योजले आहे.
या विकास आराखड्यात २४ क्रमांकातील पृष्ठानुसार जोगेश्वरी (पूर्व) येथील लेणींचा इतर सामाजिक सुविधांमध्ये समावेश करण्यात आला आहे. येथील लेणीच्या २०० मीटर परिघात ४४ फुटांचे दोन रस्ते आणि ६० फुटांचा एक रस्ता दाखवण्यात आला आहे.
बोरीवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणीचा भूभाग नैसर्गिक प्रदेश म्हणून या विकास आराखड्यात पृष्ठ क्र. ५५ अन्वये जरी समाविष्ट करण्यात आला असला, तरी हा भूभाग चुकीने सीआरझेडमध्ये दाखवण्यात आला आहे. बोरीवली (पश्चिम) मंडपेश्वर लेणीचा समावेश पृष्ठ क्र . ६८ मध्ये इतर सामाजिक सुविधांमध्ये करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुंबईचा विकास आराखडा पूर्णपणे रद्द करण्यात यावा, अशी मागणी आता राजकीय पक्षांकडूनही जोर धरू लागली आहे. आम आदमीच्या पक्षातर्फे रविवारी विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय शिबिर घेण्यात आले. या शिबिरात विकास आराखड्यातील त्रुटी आणि सूचना तज्ज्ञांच्या समितीने मांडल्या.
विकास आराखडा असंख्य चुकांनी भरलेला आहे. शहरातील गरिबांचा आणि अनौपचारिक अर्थव्यवस्थेचा त्यात कोणताही विचार नाही. मुंबईकर यातील सर्वात मोठे भागीदार असल्यामुळे त्यांच्या सहभागाने हा विकास आराखडा नव्याने तयार करण्यात यावा, असे म्हणणे शिबिरादरम्यान मांडण्यात आले.

च्मुंबईच्या विकास आराखड्यात मंदिर, मशीद, चर्च अशा प्रार्थनास्थळांचा समावेश रहिवासी आणि व्यावसायिक विभागांत करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी समाजवादी पार्टीने केली आहे. झोपडपट्टीवासीयांनाही विकास आराखड्यातून बगल दिल्याची नाराजीही सपाने सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
च्या वेळी आमदार अबू आझमी म्हणाले की, सर्वच धर्मांच्या प्रार्थनास्थळांचा उल्लेख विकास आराखड्यात धार्मिक स्थळ म्हणूनच करणे गरजेचे आहे. झोपडपट्टीवासीयांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे नवा विकास आराखडा तयार करावा आणि जुन्या विकास आराखड्यात गंभीर चुका करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी आझमी यांनी केली.

च्मुस्लिमांचा मताधिकारी काढून घेण्याची मागणी करणाऱ्या खासदार संजय राऊत यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी आझमी यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा अर्थ राऊत यांना समजला नसल्याचा टोलाही त्यांनी या वेळी लगावला. घटनेने सर्व समाजघटकांना समान अधिकार दिला असून शिवसेनेतील हाजी अराफतसारख्या मुस्लीम कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा विचार करण्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Synopsis of ancient caves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.