Join us

टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 10:43 IST

ओशिवरा पोलीस ठाण्यात कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल

मुंबई: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. कुमार यांच्यावर त्यांच्या महिला सहकाऱ्यानं हा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप भूषण कुमार यांना अटक करण्यात आलेली नाही. भूषण कुमार यांनी नोकरीचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्या सहकारी महिला कर्मचाऱ्यानं केला आहे. या प्रकरणी तिनं ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र अजून या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही एका महिलेनं भूषण कुमार यांना चित्रपटात काम देण्यासाठी भूषण कुमार यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला होता. 'मी चित्रपटसृष्टीत नवीन होते. त्यावेळी मी खूप घाबरले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याची माहिती समजली,' असं पीडित महिलेनं म्हटलं होतं. भूषण कुमार यांनी करिअर उद्ध्वस्त करुन टाकण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिनं केला होता. हे सर्व आरोप कुमार यांनी फेटाळले होते.  

टॅग्स :लैंगिक शोषणभुषण कुमार