बापरे! ३५० कोटींची अफरातफर; तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप प्रकरणात मोठे पुरावे हाती!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 08:25 PM2021-03-04T20:25:04+5:302021-03-04T20:26:06+5:30
Taapsee Pannu and Anurag Kashyap IT Raid: आयकर विभागाच्या छापेमारीत मोठे पुरावे अधिकाऱ्यांच्या हाती.
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu), दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि विकास बहल (Vikas Bahal) यांच्या घरावर बुधवारी रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाची छापेमारी सुरू होती. आयकर विभागाच्या या छापेमारीत मोठे पुरावे अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याचं आता समोर आलं आहे. (IT Raid on Taapsee Pannu and Anurag Kashyap house and offices evidence found)
आयकर विभागाच्या माहितीनुसार दोन मोठ्या फिल्म प्रोडक्शन, अभिनेत्री तापसी पन्नू आणि दोन व्यवस्थापन कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. छापेमारीत मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद येथील घर आणि कार्यालयांचा समावेश होता. एकूण मिळून तब्बल २८ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यात मिळकत (income) आणि शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे पुरावे आयकर विभागाच्या हाती लागले आहेत. आयकर विभागाला या प्रकरणात एकूण मिळून ३५० कोटी रुपयांच्या कर चोरीची शंका आहे.
तापसी-अनुरागनंतर तपासाची व्याप्ती आणखी वाढली, रिलायन्स एंटरटेनमेन्टसह 4 कंपन्यांवर ITच्या धाडी
अभिनेत्री तापसी पन्नू हिच्याकडून ५ कोटी रुपयांचे नगद व्यवहाराच्या पावत्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. याशिवाय, अनुराग कश्यपच्या चौकशीत आयकर विभागाला २० कोटी रुपयांपर्यंतचे कर चोरीचे पुरावे हाती मिळाले आहेत. याच पद्धतीचे काही पुरावे तापसीकडेही सापडले आहेत. या प्रकरणी आता तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राजकारण तापलं
तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या घर व कार्यालयांवरील आयकर विभागाच्या छाप्यांवरुन राज्यात राजकारण देखील सुरू झालं आहे. देशात आता लोकशाही संपुष्टात आली असून हुकूमशाही आली आहे. इथं आता राजे आणि नवाबांची हुकूमशाही अस्तित्वात आलीय. राजाच्या विरोधात कुणी काही बोललं की त्याला तुरुंगात धाडण्यात येतं, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे.
ट्विट्स, जोक्स, मीम्स...! तापसी पन्नू व अनुराग कश्यपवरच्या धाडसत्रानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर
राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही आयकर विभागाच्या धाडींवरुन केंद्रावर टीका केलीय. "जे लोक केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात बोलत आहेत. लोकशाही वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच लोकांवर छापे टाकले जात आहेत", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.