ताडदेव आरटीओची पाच एकर जागेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2016 01:57 AM2016-07-29T01:57:57+5:302016-07-29T01:57:57+5:30

मोठ्या प्रमाणात होत असलेली वाहनांची नोंद, दिले जाणारे फिटनेस सर्टिफिकेट पाहता, दक्षिण मुंबईतील सर्वात व्यस्त अशा ताडदेव आरटीओला सध्याची जागाही अपुरी पडत आहे. अपुऱ्या पडत

Taddeo RTO demanded five acres of land | ताडदेव आरटीओची पाच एकर जागेची मागणी

ताडदेव आरटीओची पाच एकर जागेची मागणी

Next

मुंबई :मोठ्या प्रमाणात होत असलेली वाहनांची नोंद, दिले जाणारे फिटनेस सर्टिफिकेट पाहता, दक्षिण मुंबईतील सर्वात व्यस्त अशा ताडदेव आरटीओला सध्याची जागाही अपुरी पडत आहे. अपुऱ्या पडत असलेल्या जागेमुळे ताडदेव आरटीओने पाच एक जागेची मागणी नुकतीच शासनाकडे केली आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
अंधेरी आरटीओची नवी इमारत बांधतानाच बोरीवली आरटीओतही बदल करण्यात आला. मात्र, सर्वात प्रथम आरटीओ कार्यालय असणारे दक्षिण मुंबईतील ताडदेव आरटीओत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ताडदेव आरटीओ कार्यालय हे जवळपास सात एकर जागेत वसले आहे. मात्र, दिवसेंदिवस वाहनांची वाढत जाणारी नोंदणी, फिटनेस चाचणीसाठी येणाऱ्या वाहनांची
संख्या पाहता, ही जागा अपुरी पडत आहे.
ताडदेव आरटीओत वर्षाला ४0 ते ५0 हजार वाहनांची नोंद होत आहे, तर लर्निंग लायसन्सची संख्या ही जवळपास एक लाख एवढी आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येक वर्षी ३0 हजारांपेक्षा जास्त वाहने फिटनेस चाचणीसाठी येतात. ही संख्या प्रत्येक वर्षी वाढत जात असतानाच वाहन चाचणी आणि फिटनेस चाचणीसाठी जागा अपुरी पडतानाच आधुनिक ट्रॅकही उपलब्ध नसल्याने पाच एकर जागेची मागणी आठवड्यापूर्वीच शासनाकडे करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
ही जागा मिळाल्यास वाहन योग्यता तपासणी सेंटर व वाहन फिटनेस चाचणी, तपासणी केंद्र उभारले जाईल. ही जागा मिळावी, यासाठी नवीन विकास आराखड्यात आरक्षण ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

वाहन नोंदणी
वर्षनोंदणी
२0१३-१४४८,३६१
२0१४-१५४९,८१५

लर्निंग लायसन्स
वर्षनोंदणी
२0१३-१४१,0५,५६८
२0१४-१५९५,९६५

फिटनेस सर्टिफिकेट
वर्षनोंदणी
२0१३-१४३३,0७१
२0१४-१५३१,५४१

दिवसेंदिवस वाहनांची वाढत जाणारी नोंदणी, फिटनेस चाचणीसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या पाहता, ही जागा अपुरी पडत आहे.

Web Title: Taddeo RTO demanded five acres of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.