ताडदेवच्या आरटीओ कार्यालयाला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:54 AM2018-08-06T01:54:53+5:302018-08-06T01:55:04+5:30

ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाला लागलेल्या आगीत शिकाऊ परवाना विभागातील महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली.

Taddev's RTO office took fire | ताडदेवच्या आरटीओ कार्यालयाला लागली आग

ताडदेवच्या आरटीओ कार्यालयाला लागली आग

Next

मुंबई : ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाला लागलेल्या आगीत शिकाऊ परवाना विभागातील महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. रविवारी पहाटे लागलेल्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तब्बल तीन तासांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.
ताडदेव येथील सीताराम घाडीगावकर मार्गावरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) सकाळी ५ वाजून २० मिनिटांनी आग लागल्याची घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे आठ फायर इंजीन, रुग्णवाहिका इत्यादी यंत्रणा दाखल झाली होती. अग्निशमन दलाला सकाळी ८ वाजून १० मिनिटाने आग विझविण्यात यश आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, प्राथमिक पाहणीनुसार आग शॉर्टसर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चौकशीअंती आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.
आरटीओ कार्यालयात लागलेल्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आंतरराष्ट्रीय परवाना कागदपत्रे, नवीन परवान्यासाठी बायोमेट्रिकसंबंधी कामे या कार्यालयात होत होती. या महत्त्वाच्या कागदपत्रांसह फर्निचर, वातानुकूलित यंत्रणा, लाकडी खुर्ची, कार्यालयातील संगणक, प्रिंटर, साहित्य जळून खाक झाले.
आगीची माहिती मिळताच परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष सिंग आणि परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. ‘सोमवारपासून नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरती सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे शिकाऊ परवानासाठीचे काम त्वरित पूर्ववत होईल,’ असा विश्वास परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी व्यक्त
केला.
>परवाना मिळण्यास विलंब
ताडदेव आरटीओ राज्यातील जुन्या आणि महत्त्वाच्या आरटीओपैकी एक आहे. सुमारे ७ एकर जागेत पसरलेल्या आरटीओमध्ये ब्रिटिश बनावटीची एकूण १३ विविध कार्यालये आहेत. आगीच्या घटनांमुळे काही काळ नागरिकांना परवाना मिळण्यास विलंब होणार असल्याची माहिती आरटीओतील सूत्रांनी दिली.
ताडदेव आरटीओला यंदा तिसºयांदा आग लागली आहे. पहिल्यांदा ३१ जानेवारी २०१५ मध्ये बी कार्यालयाला आग लागली होती. ३ मार्च २०१५ रोजी जप्त केलेली वाहने उभी करण्याच्या ठिकाणी आग लागली होती.

Web Title: Taddev's RTO office took fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.