तायक्वांडो प्रशिक्षकावर विनयभंगाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 03:38 AM2018-10-26T03:38:36+5:302018-10-26T03:38:39+5:30

पुण्यातील राष्ट्रीय खुल्या तायक्वांडो स्पर्धेत सहभागी झालेल्या मुरैनाच्या १५ वर्षीय खेळाडूने प्रशिक्षक मनोज शिवहरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा आरोप केला आहे.

Taekwondo coach blamed for molestation | तायक्वांडो प्रशिक्षकावर विनयभंगाचा आरोप

तायक्वांडो प्रशिक्षकावर विनयभंगाचा आरोप

Next

मुंबई : पुण्यातील राष्ट्रीय खुल्या तायक्वांडो स्पर्धेत सहभागी झालेल्या मुरैनाच्या १५ वर्षीय खेळाडूने प्रशिक्षक मनोज शिवहरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा आरोप केला आहे. शिवहरेने एकाच खोलीत तीन मुली व दोन मुलांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. आणि त्याने मुलींशेजारी झोपून अश्लील चाळे केल्याचा आरोप अल्पवयीन महिला खेळाडूने केला आहे. त्यानुसार, शिवहरेला पॉक्सो तसेच विनयभंगाच्या गुन्ह्यांत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, १९-२० आॅक्टोबर दरम्यान पुण्यात या स्पर्धा पार पडल्या. शिवहरेने सर्वांची एकाच खोलीत राहण्याची व्यवस्था केली. मुलींना बेडवर तर मुलांना जमिनीवर झोपविण्यात आले होते. यावेळी तो स्वत मात्र मुलींच्या शेजारी झोपला. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याने अश्लील चाळे केले.
मुरैना येथील महावीरपुरा येथे असलेल्या तायक्वांडो टेÑनर कोचिंग सेटरमध्ये २२ आॅक्टोबरला एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकावलेल्या खेळाडूंचा विशेष सत्कार होणार होता. या स्पर्धेत तक्रारदार मुलीने सुवर्ण पटकावले होते. मात्र तिने या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला. त्यामुळे कुटुंबियांनी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, शिवहरेचा कृत्याला वाचा फुटली.
यावेळी मुलीने आईला सांगितले, ‘रात्री शिवहरेकडून अश्लील वर्तन सुरु होते. यावेळी मी घाबरुन खाली झोपण्यास गेले, पण सर तिथेही आले. मी त्यांना मला झोपू द्या, उद्या माझी फाइट आहे, असे म्हटले. पण रात्रभर ते अश्लील चाळे करत राहिल्याने मी घाबरली. मात्र या परिस्थितीतही मी सुवर्ण पदक जिंकल्याचे कुटुंबियांना सांगितले.
हे ऐकून मुलीच्या आईला धक्का बसला. तिने मुलीसह आईने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पुणे पोलिसांनी शिवहरेला अटक केली. मात्र, ‘मी निर्दोष असून मला मुद्दाम या प्रकरणात अडकविण्यात येत आहे, असे शिवहरेचे म्हणणे आहे.
>पोलिसांनी केली अटक
शिवहरेचे कृत्य ऐकून मुलीच्या आईला धक्का बसला. तिने मुलीसह थेट पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पुणे पोलिसांनी शिवहरेला अटक केली.
मात्र मी निर्दोष असून मला मुद्दाम या प्रकरणात अडकविण्यात येत असल्याचे शिवहरेचे म्हणणे आहे.

Web Title: Taekwondo coach blamed for molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.