मुंबई : आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशासाठी ठरावीक शाळांकडेच पालकांचा ओढा आहे. आरटीईच्या पहिल्या सोडतीनंतर पहिल्या टप्प्यातील प्रवेशप्रक्रिया ११ एप्रिलपासून सुरू झाली आहे. दरम्यान, पालिका आणि डिव्हायडी (इतर माध्यमांच्या शाळा) मिळून तब्ब्ल २७ शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांनी एकही अर्ज न केल्याचे समोर आले आहे.याउलट अंधेरीच्या वाडिया स्कूलमध्ये ज्युनिअर केजीच्या ५० जागांसाठी सर्वाधिक म्हणजे ७९० अर्ज प्राप्त झाले आहेत. याचप्रमाणे, त्याखालोखाल चेंबूरच्या माथोर्मा स्कूलमधील ज्युनिअर केजीच्या ३० जागांसाठी ७८६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामुळे आरटीईसाठी ठरावीक शाळांकडे पालकांचा ओढा असल्याचे स्पष्ट झाले आहे.शून्य अर्जाच्या शाळांमध्ये आरटीईसाठी तब्ब्ल २३२ जागा उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी पालकांकडून एकही अर्ज करण्यात आलेला नाही. यामध्ये शाळांची नावे पालकांना माहीत नसणे, नव्याने मान्यता मिळालेल्या शाळा असल्याने पालकांनी त्यास पसंती दिली नसल्याचे समोर येत आहे, तसेच शहरातील नावाजलेल्या शाळांमध्ये प्रवेशसंख्येच्या तिप्पट अर्ज प्राप्त झाल्याचे चित्रही दिसून आले.>अशी आहे प्रवेश प्रक्रिया८ एप्रिल रोजी पुण्यात राज्यस्तरीय सोडत काढल्यानंतर ११ एप्रिलपासून आरटीई प्रवेशामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची छाननी प्रक्रिया आणि प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.ही प्रक्रिया २४ एप्रिलपर्यंत सरू राहणार आहे. आरटीई प्रवेशाच्या नियमानुसार रहिवाशी पत्त्याच्या जवळच्या शाळेतच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.सर्वात आधी शाळेपासून १ कि.मी. अंतरापर्यंत राहणाऱ्या पालकांच्या मुलांना प्रवेशासाठी संधी मिळणार आहे. त्यानंतर, दुसºया टप्प्यात १ ते ३ कि.मी. पर्यंतच्या अंतरापर्यंत राहणाºया मुलांना प्रवेश दिला जाणार आहे.उर्वरित प्रवेशासाठी ३ कि.मी. अंतराच्या पुढील मुलांना संधी मिळणार आहे. मात्र, या सर्व नियमांना बाजूला सारत ठरावीक शाळांकडे पालकांचा ओढा वाढत असल्याचे प्रवेश अर्जावरून समोर आले आहे.
मुंबईच्या २७ शाळांत आरटीई प्रवेशासाठी पालकांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 6:38 AM