Join us

अर्थसंकल्पाच्या दिवशी तैमुर होता ट्रेंडमध्ये, युजर्संकडून प्रतिक्रियेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 10:57 AM

अर्थसंकल्पाच्या दिवशी तैमुर ट्विटर होता ट्रेडिंगमध्ये.

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प सादर केला. जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे आपल्या आयुष्यावर किती परिणाम होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक नागरिक गुरुवारी अर्थसंकल्प ऐकण्यात व्यस्त होता. मात्र, ट्विटर काहीतरी भलताच ट्रेंड सुरू होता. दुसरं-तिसरं काही नाही तर सर्वांचा लाडका, करिना-सैफचा 'तैमुर' हा ट्विटरवर ट्रेंडमध्ये होता. अर्थसंकल्पाच्या वातावरणात मज्जा-मस्करी करण्यासाठी काही युजर्संनी ट्विटरवर तैमुरला ट्रेंडमध्ये आणलं. काही युजर्संना अर्थसंकल्पावर तैमुरची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती, तर काही म्हणाले की, अर्थसंकल्प तर ठिक आहे पण आज तैमुरनं नाश्ता केला की नाही? असा प्रश्नदेखील ट्विट केला. 

एकानं ट्विट केले की, सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामुळे तैमुर खूश नाहीय, कारण पॅम्पर्स बेबी डायपर्सवर सूट देण्यात आलेली नाही. सैफ-करीना तैमुरच्या जीम मेंबरशिपसाठी सबसिडीची मागणी करत आहेत,  असंही एकानं लिहिलंय. तैमुरसंदर्भात अशा प्रकारचे बरेच मजेशीर ट्विट युजर्संनी केले आहेत. दरम्यान, स्टारकिड्समध्ये तैमुर किती प्रसिद्धी आहे, हे या ट्विट्सवरुन दिसत आहे.

 

 

 

 

 

टॅग्स :तैमुरअर्थसंकल्प २०१८करमणूकअरूण जेटली