‘टेक आॅफ’ सुकर

By admin | Published: July 23, 2014 12:22 AM2014-07-23T00:22:13+5:302014-07-23T00:32:30+5:30

लो कॉस्ट विमानतळांमध्ये कोल्हापूर

'Take the Off' | ‘टेक आॅफ’ सुकर

‘टेक आॅफ’ सुकर

Next

कोल्हापूर : ‘लो कॉस्ट’ विमानतळांमध्ये कोल्हापूर विमानतळाचा समावेश झाल्याने येथून विमानसेवेच्या ‘टेक आॅफ’चा मार्ग सुकर झाला आहे. देशातील ५० ठिकाणांच्या लहान शहरांमध्ये दोनशे ‘लो कॉस्ट’ विमानतळांची सुविधा पुरविण्याची घोषणा नागरी उड्डाण राज्यमंत्री जी. एम. सिद्धराव यांनी काल, सोमवारी लोकसभेत केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच विमानतळांचा समावेश आहे.
विमानप्रवासासाठी अधिक प्रोत्साहित करण्यासाठी हे विमानतळ सुरू करण्यात येणार आहेत. काही विमानतळांचा विकास पब्लिक -प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून केला जाणार आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती, जळगाव हे विमानतळ विकसित केले जाणार आहेत. कोल्हापूर विमानतळ राज्य सरकारने भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाकडे गेल्यावर्षी हस्तांतरित केले आहे. विमानतळ विकसित करण्याची झालेली ही घोषणा कोल्हापूरच्या उद्योग, व्यापार, पर्यटन, आदी क्षेत्रांतील विकासाला बळ देणारी आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापूरच्या विकासासाठी विमानसेवा सुरू होण्यासह त्याचा विकास करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी २५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी, या मागणीचे निवेदन गेल्या १५ दिवसांपूर्वी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी दिले होते. त्यानंतर आता ‘लो कॉस्ट’ विमानतळांमध्ये कोल्हापूर विमानतळाचा समावेश
करण्याची घोषणा लोकसभेत झाली. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावर ए-३२० विमान उतरविण्याची सुविधा, धावपट्टी विस्तार २५०० मीटर, नाईट लँडिंग फॅसिलिटी, आदी सुविधा उपलब्ध होतील.
- खासदार धनंजय महाडिक

Web Title: 'Take the Off'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.