विनाकारण फिरणाऱ्या 'हायएन्ड' गाड्यांवर  कारवाई करा - पोलीस आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 04:07 PM2020-06-29T16:07:47+5:302020-06-29T16:10:18+5:30

गाडीच्या नुकसानाची भरपाई कोण देणार?,  कर्मचाऱ्यांचा 'टॉप कॉप' ना सवाल

Take action against high end vehicles - Commissioner of Police | विनाकारण फिरणाऱ्या 'हायएन्ड' गाड्यांवर  कारवाई करा - पोलीस आयुक्त

विनाकारण फिरणाऱ्या 'हायएन्ड' गाड्यांवर  कारवाई करा - पोलीस आयुक्त

Next
ठळक मुद्दे लॉकडाऊनदरम्यान हस्तगत केलेल्या गाड्या बऱ्याचदा पोलीस ठाण्याच्या आवारातच जमा करण्यात आल्या होत्या. आता डबलसीट, विनाकारण बाहेर फिरणे आणि कारमध्ये अधीक लोकांची संख्या मुंबईकरांवर कारवाईचा बडगा उगारण्यास कारणीभूत ठरणार आहे.

गौरी टेंबकर - कलगुटकर


मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांचे 'डेस्टिनेशन' वर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. या गाड्या ठेवण्यासाठी 'जागा शोधा' अशाही सूचना देण्यात आल्या असुन विनाकारण फिरणाऱ्या 'हाय एन्ड' किंवा महागड्या लक्जरी कारचाही समावेश असणार आहे. मात्र ,कारवाई दरम्यान या गाड्यांचे काही नुकसान झाल्यास भरपाई कोण देणार ? असा सवाल आता पोलीस कर्मचाऱ्याकडून आयुक्त
परमबीर सिंह यांना विचारला जात आहे.

लॉकडाऊनदरम्यान हस्तगत केलेल्या गाड्या बऱ्याचदा पोलीस ठाण्याच्या आवारातच जमा करण्यात आल्या होत्या. काही गाड्या नंतर सोडून देण्यात आल्या तर काहीचे मालक ते घेण्यासाठी न आल्याने त्या गाड्या अक्षरशः सडल्याची परिस्थिती आहे. याठिकाणी नव्याने हस्तगत करण्यात आलेल्या गाड्या ठेवण्यासाठी जागाच नसल्याने नवीन जागा शोधण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएमडब्ल्यू किंवा त्यासारख्या महागड्या गाड्या हस्तगत करून त्या टो करत पोलीस ठाणे अथवा एखाद्या ठिकाणी आम्ही पार्क करू. मात्र करोडो रुपये किंमत असलेल्या या गाडीचा पेंट खराब झाला, टायर किंवा अन्य कोणत्याही गोष्टींचे नुकसान झाले तर त्याची भरपाई कोण करणार....'एक एक भागाची किंमत  लाखोंच्या घरात असल्याने आम्ही आयुष्यभराची कमाई जरी दिली आणि मरेपर्यंत चाकरी केली तरी त्याची परतफेड करू शकणार नाही' असे एका पोलिसाने 'लोकमत' शी बोलताना सांगितले... या व्यतिरिक्त पोलिसांना कंटेन्मेंट झोनमध्ये अधिकारी नियुक्त करून त्याठिकाणी वर्दळीला मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याठिकाणी आयुक्त स्वतः भेट देणार असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता डबलसीट, विनाकारण बाहेर फिरणे आणि कारमध्ये अधीक लोकांची संख्या मुंबईकरांवर कारवाईचा बडगा उगारण्यास कारणीभूत ठरणार आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

Web Title: Take action against high end vehicles - Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.