संजय राऊतांवर कारवाई करा; मेधा सोमय्यांची मागणी, १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 05:49 AM2022-05-19T05:49:05+5:302022-05-19T05:49:47+5:30

शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात मेधा सोमय्या यांनी १०० कोटी रुपयांचा फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात केला आहे. 

take action against sanjay raut medha somaiya demand claim for damages of rs 100 crore | संजय राऊतांवर कारवाई करा; मेधा सोमय्यांची मागणी, १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा 

संजय राऊतांवर कारवाई करा; मेधा सोमय्यांची मागणी, १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : १०० कोटी रुपयांच्या कथित शौचालय घोटाळ्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या व युवा प्रतिष्ठानला गोवल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात मेधा सोमय्या यांनी १०० कोटी रुपयांचा फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात केला आहे. 

शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या महिन्यात संजय राऊत यांनी आपल्यावर केलेले आरोप तथ्यहीन आहेत आणि ते बदनामीकारक आहेत. १५ व १६ एप्रिलची वर्तमानपत्रे पाहून मला धक्का बसला. राऊत यांनी माझे पती व माझ्यावर मीरा-भाईंदर पालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल व दुरुस्ती आणि बांधकामात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. राऊत यांना नोटीस बजावण्यात यावी व त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी मेधा यांनी दाव्यात केली आहे. 

Web Title: take action against sanjay raut medha somaiya demand claim for damages of rs 100 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.