Join us  

‘रे रोड येथील ड्रग्ज माफियांवर कारवाई करा’

By admin | Published: February 09, 2016 3:16 AM

मुंबईतील ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश करणाऱ्या ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. रे रोड येथे सर्रासपणे रस्त्यावर होणाऱ्या चरस विक्रीला

मुंबई : मुंबईतील ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश करणाऱ्या ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. रे रोड येथे सर्रासपणे रस्त्यावर होणाऱ्या चरस विक्रीला ‘स्टिंग आॅपरेशन’ने वाचा फोडल्यानंतर भायखळा पोलिसांनी यावर कारवाई करावी, म्हणून युवा ऊर्जा फाउंडेशनने सोमवारी निवेदन दिले.तरुणांसाठी कार्यरत असलेल्या या फाउंडेशनने ‘लोकमत’चे आभार मानत रे रोड परिसरात जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रग्ज माफियांवर भायखळा पोलिसांनी कारवाई करावी, म्हणून दबाव निर्माण करणार असल्याचे फाउंडेशनचे सरचिटणीस आशिष चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण म्हणाले की, लवकरच परिसरात फाउंडेशनतर्फे नशामुक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जाईल.यापुढे भायखळा, रे रोड, कॉटनग्रीन परिसरात ड्रग्जची विक्री होऊ देणार नसल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष अजय लांडे यांनी सांगितले. लांडे म्हणाले की, फाउंडेशनचे कार्यकर्ते यापुढे संशयित ठिकाणी नजर ठेवतील. पोलिसांनी कारवाई केली नाही, तर स्थानिकांच्या मदतीने मोर्चाही काढला जाईल.